Summer Skin Care: उन्हाळ्यात त्वचेची चमक टिकवण्यासाठी हळद- मधाचा 'हा' सोप्पा फेसपॅक ठरेल बेस्ट; जाणून घ्या फायदे आणि बनवण्याची पद्धत

हा उपाय म्हणजे हळद आणि मधाचा फेसपॅक (Honey- Turmeric Facepack) . या फेसपॅकचे फायदे आणि बनवण्याची पद्धत या लेखातून सविस्तर जाणून घ्या..क्ष

Turmeric Honey DIY Mask (Photo Credits: Pixabay)

उन्हाळा (Summer 2020) आला की त्वचा काळवंडणे , तेलकट त्वचा (Oily Skin) असल्यास चेहऱ्यावर मुरूम, पिंपल्स (Pimples) येणे असे अनेक त्रास सुरु होतात. हा जवळपास दरवर्षीचा त्रास आहे पण त्यावर काही एक थेट औषध नाही. जर का तुम्हाला या त्रासापासून स्वतःला लांब ठेवायचे असेल तर तुम्हाला वेळ काढून त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहेच. यामध्ये तुमचा कमी त कमी वेळ जावा आणि अधिक फायदा व्हावा यासाठी एक अत्यंत नैसर्गिक किंबहुना आजीच्या बटव्यातील म्हणता येईल असा उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत. विविध प्रसाधने वापरून चेहऱ्यावर केमिकलचा मारा करण्याऐवजी या नैसर्गिक मार्गाने तुम्ही चेहर्‍याला फ्रेश ठेवू शकता. हा उपाय म्हणजे हळद आणि मधाचा फेसपॅक (Honey- Turmeric Facepack) . या फेसपॅकचे फायदे आणि बनवण्याची पद्धत या लेखातून सविस्तर जाणून घ्या.. Beauty Tips For Summer: मुलायम केस आणि टवटवीत त्वचेसाठी ताकाचा 'असा' ही करता येईल वापर; जाणून घ्या

चेहऱ्यासाठी कसा फायद्याचा आहे हळद मधाचा फेसपॅक

मध आणि हळद या पदार्थाचे सर्व प्रकारच्या त्वचेवर अत्यंत चमत्कारी परिणाम होतात. हळदमध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात जे त्वचेच्या ग्लो आणि चमक वाढविण्यास मदत करतात तर दुसरीकडे, मधातील फ्रुक्टोज आणि ग्लूकोजमध्ये प्रथिने, अमीनो ऍसिड्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि त्वचेत सुधारणा घडविणारे एन्झाइम्स असतात. मध आणि हळद यांचे मिश्रण त्वचेच्या पोअर्स मधील मळ दूर करतात परिणामी काळे डाग दूर होतात व त्वचेवरील चमक कायम राहते. तसेच चेहऱ्यावरील घाण निघून गेल्याने पिंपल्स, मुरूम असे त्रास सुद्धा दूर होतात. Summer Food: उन्हाळ्यात कैरी खाण्याचे आहेत 'हे' भन्नाट फायदे; वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

याशिवाय जर का आपल्या चेहऱ्यावर मुरूम आले असेल तरी हा पॅक लावणे फायद्याचे ठरते. याचे कारण म्हणजे मध त्वचेवर ओस्मोटिक प्रभाव टाकते ज्यामुळे जळजळ कमी होते. तर हळदीमध्ये कर्क्यूमिनोइड द्रव्ये असल्यामुळे चेहऱ्याला अँटीऑक्सिडेंट्स मुबलक प्रमाणात मिळतात. मधात मिसळल्यावर हळदीचा मुख्य घटक कर्क्यूमिन मुरुमांमुळे मुरुमांमधील सूक्ष्म जीवांना मारून टाकतो. चेहऱ्यावरील केस निघून जाण्यातही याची मदत होते त्यामुळे तुमच्या भुवयांना व केसांना याचा स्पर्श सुद्धा होणार नाही याची काळजी घ्या.

कसा बनवाल हळद मधाचा फेसपॅक

(टीप - वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. त्वचेसंबंधी काही आजार असल्यास सर्वात आधी त्वचा तज्ञांचा सल्ला घ्या)