Best Tourism Villages 2023: वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने जाहीर केली जगातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गावांची यादी; भारतामधील Dhordo गावाचा समावेश

धोर्डो येथे G20 च्या भारताच्या अध्यक्षतेखाली प्रभावशाली गटाच्या पहिल्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीचे आयोजन केले होते.

Dhordo (Photo Credit-X/@piyushgoyal)

वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) ने 2023 च्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गावांची (Best Tourism Villages 2023) यादी जाहीर केली आहे. जागतिक पर्यटन संघटनेद्वारे ग्रामीण भागांचे संगोपन करण्यात आणि लँडस्केप, सांस्कृतिक विविधता, स्थानिक मूल्ये आणि खाद्य परंपरा जपण्यात अग्रेसर असलेल्या गावांना या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे. या तिसऱ्या आवृत्तीत जवळपास 260 अर्जांमधून सर्व प्रदेशातील 54 गावांची निवड करण्यात आली आणि आणखी 20 गावे अपग्रेड प्रोग्राममध्ये सामील झाली आहेत. सर्व 74 गावे आता UNWTO बेस्ट टुरिझम व्हिलेज नेटवर्कचा भाग आहेत.

जागतिक पर्यटन संघटनेने गुरुवारी जाहीर केलेल्या उत्कृष्ट पर्यटन गावांच्या यादीत गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील धोर्डो गावाचा समावेश करण्यात आला आहे. धोर्डो येथे G20 च्या भारताच्या अध्यक्षतेखाली प्रभावशाली गटाच्या पहिल्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीचे आयोजन केले होते. 2021 मध्ये सुरू करण्यात आलेला हा उपक्रम UNWTO च्या ग्रामीण विकास पर्यटन कार्यक्रमाचा एक भाग आहे. (हेही वाचा: पुन्हा सुरु झाली अलिशान 'डेक्कन ओडिसी ट्रेन'; मिळणार हेल्थ स्पा, जिम, इंटरनेट, म्युझिक प्लेअर अशा सुविधा, जाणून घ्या 2023-24 मधील सहली)

खालील घटकांद्वारे केले गावांचे मूल्यमापन-

सांस्कृतिक आणि नैसर्गिक संसाधने

सांस्कृतिक संसाधनांचे संवर्धन

आर्थिक शाश्वतता

सामाजिक शाश्वतता

पर्यावरणीय स्थिरता

पर्यटन विकास आणि मूल्य साखळी एकत्रीकरण

पर्यटनाचे प्रशासन आणि प्राधान्य

पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी

आरोग्य आणि सुरक्षा

या' ठिकाणी तुम्ही संपूर्ण यादी पाहू शकता

निवेदनानुसार, धोर्डो व्यतिरिक्त, भारतामधील ‘मडला’ गावाला या वर्षी अपग्रेड कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निवडण्यात आले आहे. दरम्यान नुकतेच केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून 2023 चे भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटन व्हिलेज म्हणून पंजाबच्या गुरुदासपूरमधील ‘नवानपिंड सरदारन’ (Nawanpind Sardaran) गावाची निवड करण्यात आली आहे. यासाठी 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 750 गावांनी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2023 साठी अर्ज केले होते.