Anant Ambani-Radhika Merchant 2nd Pre-Wedding Bash: इटली-फ्रान्स मध्ये राधिका-अनंतच्या प्री वेडिंग क्रुझ पार्टीचं 29 मे ते 1 जून दरम्यान 'असं' आहे नियोजन!
मार्च महिन्यात गुजरातच्या जामनगर मध्ये राधिका मर्चंट (Radhika Merchant) आणि अनंत अंबानी (Anant Ambani) यांची पहिल्या प्री वेडिंग सोहळ्यानंतर दुसरी प्री वेडिंग पार्टी इटली (Italy) मध्ये संपन्न होत आहे. इटली-फ्रान्स दरम्यान एका क्रूझ वर स्पेस थीम (Space Theme) वर आधारित या भव्य सोहळ्यासाठी सध्या बॉलिवूड मधील अनेक बडे कलाकार, अंबानी कुटुंबियांचे निकटवर्तीय सध्या तिथे पोहचले आहे. 800 जणांसाठी ही पार्टी आयोजित करण्यात आली असून 29 मे ते 1 जून असं या पार्टीचं सेलिब्रेशन असणार आहे.
अंबानी कुटुंबातील शेंडेफळ असलेल्या अनंत अंबानीच्या लग्ना पूर्वी आयोजित या पार्टी मध्ये मुंबईच्या कलिना एअरपोर्ट वरून सलमान खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, रणवीर सिंह, एम एस धोनी रवाना झाल्याचं पहायला मिळालं आहे. या क्रूझ पार्टीला ‘La Vita E Un Viaggio’असं नाव देण्यात आलं आहे ज्याचा अर्थ ‘Life Is A Journey’ - जीवन प्रवास आहे असा होतो.
क्रुझ पार्टीमध्ये काय असणार?
इटली ते दक्षिण फ्रान्स असा क्रूझचा युरोपामध्ये प्रवास होणार आहे. 29 मेला हा प्रवास सुरू होईल. त्यामध्ये पहिल्या दिवशी वेलकम लंच, 'Starry Night'गाला पार्टी असणार आहे. त्यानंतर 30 मे दिवशी रोम मध्ये स्टॉप ओव्हर आहे. आजूबाजूच्या परिसरात पर्यटन केल्यानंतर रात्री डिनर पार्टी आहे. 31 मे दिवशी पुन्हा क्रुझ वर पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. 1 जून हा अंतिम दिवस असणार आहे. या दिवशी क्रुझचा प्रवास Portofino, Italy मध्ये संपणार आहे.
रोमन हॉलिडे मध्ये toga party चं दुसर्या दिवशी आयोजन आहे. ग्रीक रोमन संस्कृतीला आपली मानवंदना म्हणून गेस्ट ना टोगा ड्रेस मध्ये तयार होण्याचं आवहन आहे.
तिसर्या दिवशी याच क्रुझ पार्टी दरम्यान आकाश आणि श्लोका अंबानी च्या मुलीचा पहिला वाढदिवस देखील सेलिब्रेट केला जाणार आहे. पूर्वीच्या प्रीवेडिंग पार्टीप्रमाणेच, या कार्यक्रमातही पारशी, मेक्सिकन, जपानी आणि थाई पदार्थांची रेलचेल असणार आहे. दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलै दिवशी विवाह बंधनात अडकणार आहेत.