Viral Video: तरुणाचा प्रेयसीवर धारदार शस्राने हल्ला, तरुणी गंभीर जखमी; धक्कादायक Video व्हायरल

कांगडा येथे एका तरुणाने प्रेयसीवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. हल्ल्यात तरुणीची काही बोटे तुटली आहे आणि तिला गंभीर दुखापत झाली आहे.

Attack Video Viral, PC TWITTER

Viral Video: हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कांगडा येथे एका तरुणाने प्रेयसीवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. हल्ल्यात तरुणीची काही बोटे तुटली आहे आणि तिला गंभीर दुखापत झाली आहे. एकाने हा व्हिडिओ फोनमध्ये कैद केले आहे. ही घटना १३ एप्रिल रोजी घडली आहे. कोणत्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला हे अद्याप समोर आले नाही. हेही वाचा- देशविरोधी कारवायांमुळे मुंबईच्या TISS ने पीएचडी विद्यार्थ्याला केलं निलंबित

मिळालेल्या माहितीनुसार,  पालमपूर बस स्थानकाजवळ तरुणाने प्रेयसीवर हल्ला केला. सुमित चौधरी असं आरोपीचे नाव आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, सुमितच्या हातात धारदार शस्र आहे. त्यांच्यात दोघांमध्ये वाद सुरु आहे. वाद इतका टोकाला गेला की, त्याने तरुणीवर हल्ला केला. हल्ल्यात तीला गंभीर दुखापत झाली आहे. हल्ला पाहून आजूबाजूलाच्या लोकांनी आरोपीला मारहाण केली. तरुणी घाबरून घटनास्थळावरून पळाली.

आरोपीला जमावांनी पोलिसांकडे नेले आणि जखमी पीडितेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तीला पीजीआय चंदीगड येथील रुग्णालयात रेफर केले आहे. तेथे तिच्यावर उपचार सुरु आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने हल्ल्यात वापरलेला विळा देखील पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement