Insect in Salad: आयएएस जोडप्याच्या सॅलडमध्ये आढळला किडा; अन्न सुरक्षा विभागाने रेस्टॉरंटला पाठवली नोटीस (Video)

आयएएस जोडप्याला जेवणात किडा आढळल्याची घटना समोर आली आहे. त्यांना दिल्या गेलेल्या सॅलडमध्ये किडा आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Insect in Salad: आयएएस जोडप्याच्या सॅलडमध्ये आढळला किडा; अन्न सुरक्षा विभागाने रेस्टॉरंटला पाठवली नोटीस (Video)
PC-X

Insect in Salad : द हाऊस ऑफ सेलेस्टे रेस्टॉरंटमध्ये (The House of Celeste)आयएएस जोडप्याला दिल्या गेलेल्या सॅलडमध्ये किडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी घडली, जेव्हा हे जोडपे त्यांच्या कुटुंबासह जेवण्यासाठी तिथे गेले होते. सॅलडमध्ये आढळलेल्या किड्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला आणि अन्न सुरक्षा विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर, जोडप्याने (IAS) त्यांची ओळख गुप्त ठेवण्याची मागणी केली. ही घटना गुडगावच्या फेज-2 च्या सेक्टर 15 मध्ये असलेल्या द हाऊस ऑफ सेलेस्टे रेस्टॉरंटची आहे.

अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले

आयएएस जोडप्याच्या तक्रारीनंतर रेस्टॉरंटची तपासणी केली. प्राथमिक तपासणीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छतता आढळून आली. पनीर, काजू, शेंगदाणे आणि हिरवी चटणीचे नमुने घेण्यात आले आणि ते कर्नाल येथील सरकारी प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आले. “प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल, परंतु आम्ही जे पाहिले ते चिंताजनक होते. आवश्यक स्वच्छता पद्धतींचे पालन केले जात नव्हते." असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अन्न सुरक्षा विभागाने रेस्टॉरंट व्यवस्थापनाला कीटक नियंत्रण रेकॉर्ड आणि FSSAI अन्न सुरक्षा प्रशिक्षण प्रमाणपत्र यासारखी सर्व आवश्यक कागदपत्रे 10 दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 9263 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).