Crime: ऑटोचालकाकडून महिलेचा विनयभंग, ताब्यात घेतले असता पळून जाण्याच्या प्रयत्नात कारची धडक बसून मृत्यू

त्यामुळे त्यांना गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. मृत ऑटोचालक मजनू का टिळा परिसरातील रहिवासी होता.

उत्तर दिल्लीतील (Delhi) सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमधून (Civil Lines Police Station) पळून जाण्याच्या प्रयत्नात एका ऑटोरिक्षा चालकाचा वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑटो चालकावर मेट्रोजवळ महिलेचा विनयभंग (Molesting) केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. मृत ऑटोचालक मजनू का टिळा परिसरातील रहिवासी होता. राहुल असे त्याचे नाव आहे. पोलिस उपायुक्त सागर सिंह कलसी यांनी सांगितले की, शनिवारी रात्री 11:15 च्या सुमारास, 40 वर्षीय महिला सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात आली आणि मेट्रो स्टेशनवर एका ऑटोरिक्षा चालकाने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला.

महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विधानसभा मेट्रो स्टेशन गाठले आणि आरोपी ऑटोरिक्षा चालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने त्याला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात आणले.पोलीस ठाण्यात आल्यानंतर राहुल त्याची ऑटोरिक्षा गेटबाहेर उभी करत असताना तक्रारदार आक्रमक झाला. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, राहुल गेटमधून पळून जात असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता (IPC) कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुलला धडकणाऱ्या अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध आयपीसीच्या कलम 279 आणि 304अ अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांना धडकलेल्या वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हेही वाचा Crime: क्रुरता ! मांत्रिकाने सांगितले मुलाचा जीव वाचवायचा असेल तर नरबळी द्यावा लागले, अंधश्रद्धेतून पोटच्या मुलीचा आईने घेतला जीव

डीसीपी कलसी यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच राहुलचे नातेवाईक पोलिस ठाण्यासमोर जमले आणि तीन-चार तास निदर्शने केली. तसेच तक्रारदार महिलेला भेटण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना निघून जाण्याची विनंती केली आणि त्यांच्या तक्रारी सोडवल्या जातील असे आश्वासन दिले.