Budget 2023 Date Time: सर्वसाधारण अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण कधी आणि किती वाजता होणार; सर्व काही येथे जाणून घ्या

हे अॅप दोन भाषांमध्ये असून इंग्रजी आणि हिंदी भाषेतून तुम्ही बजेटशी संबंधित सर्व तपशील मिळवू शकता.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Photo Credit: PTI)

Budget 2023 Date Time: सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यासाठी केवळ एक दिवस उरला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या बुधवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीला 2023-24 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) संसदेत सादर करणार आहेत. यावेळी निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील पाचवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या दोन वर्षांच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाप्रमाणे हा अर्थसंकल्पही पेपरलेस असेल.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 येथे पहा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण तुम्ही संसद टीव्ही आणि दूरदर्शनवर थेट पाहू शकता. बजेटचे थेट प्रक्षेपण त्यांच्या यूट्यूब चॅनलवरही पाहता येईल. याशिवाय, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो आपल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बजेट 2023 चे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील करेल. याशिवाय, सर्व व्यावसायिक चॅनेल आणि सामान्य वृत्तवाहिन्यांवरही त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. दुसरीकडे, तुम्ही यूट्यूबवर बजेट 2023 चे थेट प्रक्षेपण देखील पाहू शकता. फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब यांसारख्या सरकारच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बजेटचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. (हेही वाचा - Budget 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्राने आज बोलावली सर्वपक्षीय बैठक, विरोधी पक्ष सरकारसमोर मांडणार विविध मुद्दे)

Union Budget Mobile App -

केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अॅपला भेट देऊन तुम्ही बजेटची कागदपत्रे पाहू शकता. हे अॅप दोन भाषांमध्ये असून इंग्रजी आणि हिंदी भाषेतून तुम्ही बजेटशी संबंधित सर्व तपशील मिळवू शकता. हे Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सामान्य अर्थसंकल्पाच्या www.indiabudget.gov.in या वेब पोर्टलला भेट देऊनही हे अॅप डाउनलोड केले जाऊ शकते.

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 -

सरकार दरवर्षी संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन आयोजित करते. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाच्या आर्थिक विकास आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध निर्णय घेण्यात येतात. या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच अर्थमंत्री पुढील आर्थिक वर्षाचा देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतात.

2021 मध्ये सरकारने पहिल्यांदा पेपरलेस बजेट सादर केले. त्यावेळी, संसद सदस्य आणि सामान्य जनतेला बजेट दस्तऐवज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने "केंद्रीय बजेट मोबाईल अॅप" लाँच केले होते. 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण करतील. तेव्हा या मोबाईल अॅपवर अर्थसंकल्पाची कागदपत्रे उपलब्ध असतील. हे मोबाईल अॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहे.