Whale calf found at Pamban Beach: रामेश्वरम येथील पंबन बीचवर आढळला लहान व्हेलचा मृतदेह (Watch Video)

त्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.

Photo Credit- X

Whale calf found at Pamban Beach: तामिळनाडूच्या रामेश्वरममधील पंबन समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी दोन टन वजनाच्या 18 फूट व्हेल माश्याचा मृतदेह वाहून(Whale calf found at Pamban beach) आलेला आढळून आला. आज पहाटे मच्छिमारांना मृतदेह सापडला. त्यांनी ताबडतोब पोलिस अधिकाऱ्यांना कळवले. सध्या हा परिसर सील करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात राहणाऱ्या ब्राइड्स व्हेल प्रजातीचा मासा असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

अधिकारी अद्याप प्रजाती निश्चित करू शकले नाहीत. व्हेलचा रंग निळा आहे. अर्थमूव्हर वापरून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याला जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. याआधी मे महिन्यात, एक दुर्मिळ पिग्मी किलर व्हेल रामानाथपुरम रेंजमधील नरिप्पैयुर गावाजवळ समुद्रकिनाऱ्यावर सापडली होती. पिग्मी किलर व्हेल ही एक लुप्तप्राय प्रजाती आहे. जी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची 1 अंतर्गत संरक्षित आहे. 1.5 मीटर किशोर किलर व्हेलची सुरुवातीला डॉल्फिन म्हणून ओळख पटली. थुथुकुडी वन्यजीव परिक्षेत्राच्या वन अधिकाऱ्यांनी नंतर त्याला पाण्यात सोडले.