Western Ghats Heavy Rain: पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक राष्ट्रीय महामार्ग बंद

अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. अनेक रस्ते बंद झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.

Western Ghats Heavy Rain

Western Ghats Heavy Rain: पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन तीन प्रमुख मार्ग अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. अशी माहिती एका अधिकाऱ्याने  दिली. अनेक रस्ते बंद झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या प्रवक्त्याने सांगितले की, भूस्खलनामुळे गोव्याकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग 66, शिर्डीमार्गे बेंगळुरूकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग 75 आणि संपजेतून जाणारा राज्य महामार्ग 88 अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.

आता मंगळुरू ते बंगळुरूला जाणारा एकमेव मार्ग चारमाडी घाट आहे, जो बेलतंगडी, उजिरे, कोटिगेहरा, मुदिगेरे, बेलूर आणि हसनमधून जातो.