Weather Update: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मान्सूनबाबत एक मोठा अपडेट दिला आहे. IMD नुसार, मान्सून 19 मे पर्यंत दक्षिण अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि निकोबार बेटांवर प्रवेश करू शकतो. मान्सून साधारणपणे पोर्ट ब्लेअरमध्ये 20 मे, नैऋत्य भारतात 22 मे आणि केरळच्या दिशेने 1 जूनच्या सुमारास पुढे सरकत आहे. मात्र यंदा मान्सून दोन ते तीन दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. IMD नुसार येत्या 7 दिवसात मान्सून अंदमान निकोबार बेटांवर पोहोचेल. यानंतर 1 जूनपर्यंत केरळ आणि 15 जुलैपर्यंत उत्तर भारतात पोहोचेल. त्यामुळे १५ सप्टेंबरपर्यंत मान्सून माघार घेणार आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMD ने अलर्ट जारी केला
अलर्ट जारी करताना, हवामान खात्याने असेही म्हटले आहे की, यावर्षी देशातील 20 हून अधिक राज्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दक्षिण कर्नाटकात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील ५ दिवस मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान खराब राहील. येथे ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.