Weather Forecast Tomorrow: देशात कसे असेल उद्या हवामान ? जाणून घ्या, 10 जुलैचा अंदाज

दिल्ली, मुंबई, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंडसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोकाही निर्माण झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) उद्याचा म्हणजेच 10 जुलैचा अंदाज जाहीर केला आहे.

Photo Credit: Pixabay

Weather Forecast Tomorrow: सध्या देशभरात मान्सून सक्रिय आहे. दिल्ली, मुंबई, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंडसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोकाही निर्माण झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) उद्याचा म्हणजेच 10 जुलैचा अंदाज जाहीर केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील २-३ दिवसांत ईशान्य आणि लगतच्या पूर्व भारतात काही ठिकाणी अति मुसळधार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल.

 कसे राहील उद्याचे हवामान?

पुढील ५ दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, किनारी कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामध्ये पूर्व उत्तर प्रदेश, बिहारचा समावेश आहे. 10 ते 12 जुलै दरम्यान पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. त्याच वेळी, स्कायमेट या हवामान अंदाज एजन्सीने उद्याचा म्हणजे 10 जुलैचा हवामान अंदाज देखील जारी केला आहे.

स्कायमेटच्या मते, पुढील २४ तासांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर बिहार, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, बिहारचा काही भाग, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दक्षिण-पूर्व राजस्थान, पूर्व गुजरात, लक्षद्वीप, कोकण आणि गोवा, तेलंगणाचा काही भाग आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये हलका ते मध्यम पाऊस जोरदार पाऊस होऊ शकतो.

हिमाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, मध्य प्रदेश, ईशान्य भारत, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, ओडिशा, आंध्र प्रदेशची उत्तर किनारपट्टी, केरळमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. लडाख, रायलसीमा, अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.