Weather Forecast Tomorrow: देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, जाणून घ्या, 7 जुलैचा हवामान अंदाज
दिल्लीत अनेक ठिकाणी अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. डोंगराळ आणि उत्तर-पूर्व राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. राजस्थानमध्येही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) 7 ऑगस्टचा हवामान अंदाज जाहीर केला आहे.
Weather Forecast Tomorrow: देशाची राजधानी दिल्लीत मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. डोंगराळ आणि उत्तर-पूर्व राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. राजस्थानमध्येही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) 7 ऑगस्टचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. IMD नुसार, उद्या पूर्व मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. या पार्श्वभूमीवर या राज्यांमध्ये पावसाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. हे देखील वाचा: Chennai: ऑटिस्टिक मुलाचा स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू, ट्रेनर आणि मालकावर गुन्हा दाखल
जाणून घ्या, उद्याचे हवामान
स्कायमेटनेही 7 ऑगस्टचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटच्या मते, पुढील २४ तासांत उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, हिमाचलमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटे, तामिळनाडू, अंतर्गत कर्नाटक, लक्षद्वीप, जम्मू आणि कश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पूर्व गुजरातमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर सौराष्ट्र, कच्छ आणि पश्चिम राजस्थानमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.