Taj Mahal Controversy: ताजमहालात शिवाची मूर्ती बसवणार; जगद्गुरु परमहंस आचार्य यांची घोषणा

ज्यामध्ये संताने स्वतःची ओळख अयोध्येतील तपस्विनी चव्हाणी पीठाधीश्‍वरचे जगद्गुरु परमहंस आचार्य (Jagadguru Paramhans Acharya) अशी करून दिली आहे. त्यांनी दावा केला आहे की, ताजमहाल खरोखरचं तेजो महालय आहे.

Jagadguru Paramhans Acharya, ताज महाल (फोटो सौजन्य- ANI, Pixabay)

Taj Mahal Controversy: भगवे कपडे परिधान केल्यामुळे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील जगप्रसिद्ध स्मारक ताजमहालमध्ये (Taj Mahal) प्रवेश नाकारल्याचा दावा करणाऱ्या अयोध्येतील एका संताचा आणखी एक व्हिडिओ 27 एप्रिल रोजी समोर आला आहे. व्हिडिओमध्ये संताने 5 मे रोजी पुन्हा ताजमहालला जाणार असल्याचं सांगितलं आहे. आग्रा येथे धर्मसंसद आयोजित करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

ताजमहालमध्ये शिवाची मूर्ती बसवणार -

त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, संविधानाचे पालन करून ते भारताला 'हिंदू राष्ट्र' म्हणून घोषित करतील आणि ताजमहालमध्ये शिवाची मूर्ती बसवतील. तथापि, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) अधिकाऱ्याने सांगितले की, संताला भगवे कपडे परिधान करण्यासाठी मी थांबवले नाही. मी त्यांना ताजमहालला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. (हेही वाचा - Asaduddin Owaisi On Sanjay Raut: संजय राऊत यांनी राज ठाकरेंना 'हिंदू ओवेसी' म्हटल्यावर असदुद्दीन ओवेसीचा संजय राऊतांना सल्ला)

सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये संताने स्वतःची ओळख अयोध्येतील तपस्विनी चव्हाणी पीठाधीश्‍वरचे जगद्गुरु परमहंस आचार्य (Jagadguru Paramhans Acharya) अशी करून दिली आहे. त्यांनी दावा केला आहे की, ताजमहाल खरोखरचं तेजो महालय आहे.

लोकांना ताजमहालत पोहोचण्याचे आवाहन -

संत म्हणाले, 'दौऱ्याच्या दिवशी सनातन धर्म संसद आयोजित केली जाईल आणि भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले जाईल. संविधानाचे पालन करून ही कामे केली जातील. मी हिंदू संघटनांच्या सदस्यांना, लोकांना आणि इतरांना मोठ्या संख्येने ताजमहालमध्ये येण्याचं आवाहन करतो.

ताजमहालमध्ये प्रवेश करण्यास कथित बंदी संदर्भात, संत म्हणाले, "मला 27 एप्रिल रोजी भगव्या वस्त्रामुळे प्रवेश करण्यापासून रोखले गेले आणि मी परत आलो. त्यानंतर विरोध झाला आणि राजकुमार पटेल (एएसआय अधिकारी) यांनी माफी मागितली आणि मला पुन्हा येण्याचे निमंत्रण दिले. मी 5 मे रोजी ताजमहालात जाईन. तेथे मी भगवान शिवाची मूर्ती बसवणार आहे."

जगद्गुरु परमहंसाचार्य यांनी मकबऱ्यासंदर्भात दावा केला आहे की, 'आग्रामध्ये तेजो महालय आहे. ज्याला मुघल ताजमहाल म्हणतात. ताजमहालाचा इतिहास चुकीच्या पद्धतीने ठेवण्यात आला आहे. हे भगवान शिवाचे मंदिर आहे.' आग्रा झोनचे ASI अधीक्षक राजकुमार पटेल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'या व्हायरल व्हिडिओसंदर्भात मला काहीही म्हणायचे नाही. भगव्या कपड्यांमुळे त्यांना (संत) थांबवण्यात आले नाही. त्यानंतर मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांना ताजमहालमध्ये येण्याचे निमंत्रण दिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif