IPL Auction 2025 Live

Rajiv Gandhi यांच्या पुतळ्याला पंजाबमध्ये काळे फासले, स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा पंजाबमधील पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

राजीव गांधी (फोटो सौजन्य- फेसबुक)

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा पंजाबमधील पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर विरोधी पक्ष शिरोमणि अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याला काळे फासले आहे.तसेच शिखविरोधी दंगल प्रकरणी राजीव गांधी यांना देण्यात आलेला भारतरत्न पुस्कार काढून घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

1984 मध्ये उसळलेल्या शिखविरोधी दंगलीप्रकरणी लुधियानामधील राजीव गांधी यांच्या पुतळ्याला काळे फासण्यात आले आहे. तर शिरोमणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केली आहे.

या प्रकरणाची माहिती देताना लुधियानाचे पोलीस आयुक्त अश्विन कपूर यांनी असे सांगितले की, मंगळवारी राजीव गांधी यांच्या पुतळ्याला काळा रंग लावल्याचे सांगितले. तसेच  दोन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.