UPSC Extends Date: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षेची अंतिम तारीख वाढवली, येथे जाणून घ्या, संपूर्ण माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. यूपीएससीतर्फे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते, प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यात परीक्षा होते. या परीक्षेसाठी अनेक जण इच्छुक असतात. हि परीक्षा देशात होणाऱ्या सर्वात अवघड परीक्षांपैकी एक असतात. दरम्यान, अनेकांना अधिकारी होण्याचे स्वप्न असते.

Union Public Service Commission. (Photo credits: Wikimedia Commons)

UPSC Extends Date: केंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. यूपीएससीतर्फे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते, प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यात परीक्षा होते. या परीक्षेसाठी अनेक जण इच्छुक असतात. हि परीक्षा देशात होणाऱ्या सर्वात अवघड परीक्षांपैकी एक असतात. दरम्यान, अनेकांना अधिकारी होण्याचे स्वप्न असते. त्यामुळे अनेक विध्यार्थी हि परीक्षा देतात. दरम्यान, अर्जाची अंतिम तारीख वाढल्यामुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिविल सेवा परीक्षा (सीएसई) 2025 आणि भारतीय वन सेवा (आयएफओएस) 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. आता इच्छुक उमेदवार, ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, ते 18 फेब्रुवारी (संध्याकाळी 6:00 वाजता) पर्यंत अर्ज करू शकतात. याशिवाय, अर्जात काही बदल असल्यास ती बदलण्याची तारीख  19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे.  असे आयोगाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नोटमध्ये म्हटले आहे.  यापूर्वी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत होती. उमेदवारांनी http://upsconline.gov.in वेबसाइटचा वापर करून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

दरम्यान, IAS उमेदवार पूजा खेडकर ही परीक्षा बनावट कागदपत्रांद्वारे उत्तीर्ण झाल्याचे प्रकरण समोर आले होते, त्यांनी अपंग असल्याचे प्रमाणपत्र जोडले होते. त्यांना 12 वेळा परीक्षा देण्याची संधी मिळाली, तर जास्तीत जास्त 9 वेळेस त्यांनी परीक्षा दिली होती. जून 2024 मध्ये ती पुण्यात प्रशिक्षण घेत असताना फसवणूक उघडकीस आली.  त्यानंतर यूपीएससीने अर्ज प्रक्रियेत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. CSE 2022 मध्ये प्रयत्न करण्यासाठी पूजा खेडकर यांनी खोटे PwBD प्रमाणपत्रासह बनावट कागदपत्रे तयार केली होती. आता पूजा खेडकर यांना सेवेतून काढून टाकण्यात आले असून त्यांच्यावर फौजदारी खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे आता प्रत्येकाची कडक तपासणी केली जाणार आहे.

यूपीएससीच्या नोटमध्ये अर्जाची तारीख वाढवण्यामागील कारणांचा उल्लेख नाही. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, काही अर्जदारांनी पोर्टलद्वारे अर्ज करताना काही अडचणी येत असल्याची तक्रार केली होती.

नागरी सेवा पूर्व परीक्षा २५ मे रोजी होणार आहे. परीक्षेद्वारे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांची संख्या अंदाजे ९७९ असणे अपेक्षित आहे ज्यात बेंचमार्क अपंग प्रवर्गातील व्यक्तींसाठी राखीव असलेल्या ३८ रिक्त जागांचा समावेश आहे. 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now