
UP: उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी एक दिवसापूर्वी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह आता शेतात सापडला आहे. या मुलीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण गावात संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून प्रकरणाचा तपास सुरू केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कुटुंबीयांना संशय आहे की, मृत्यूपूर्वी मुलीवर बलात्कार झाला होता. आज सकाळी शेतात मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे पोलिसांचे म्हणणे आहे. हे देखील वाचा: Gaurav Kotgire Kidnapped Case: ठाकरे गटाचे नांदेड शहरप्रमुख गौरव कोटगिरे यांचे अपहरण; अवघ्या 4 तासांतचं सुटका, काय आहे नेमक प्रकरण? वाचा
येथे पाहा पोस्ट:
#फतेहपुर दिल दहला देने वाली वारदात...
16 वर्षीय लड़की की गोली मारकर हत्या,लड़की की न्यूड डेडबॉडी खेत में मिली है,कल दोपहर से लापता थी, आज लाश मिली, परिजनों को रेप होने की भी आशंका है।#fatehpur #news #sirfsuch pic.twitter.com/I4BpdSBwXZ
— ठाkur Ankit Singh (@liveankitknp) December 14, 2024
या घटनेनंतर मृत मुलीच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर गावातील लोकांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. @liveankitknp या हँडलवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.