Ramdas Athawale on Loudspeaker Row: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे लाऊडस्पीकर वादावर मोठे वक्तव्य, म्हणाले, 'आमचा पक्ष मशिदींचे संरक्षण करणार'
मशिदीतील लाऊडस्पीकर हटवायला कोणी आले तर त्यांचा पक्ष मशिदीचे रक्षण करेल आणि लाऊडस्पीकर हटवण्यासही विरोध करेल, असेही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.
Ramdas Athawale on Loudspeaker Row: महाराष्ट्रापासून सुरू झालेला लाऊडस्पीकर वाद (Loudspeaker Controversy) आता उत्तर प्रदेशापर्यंत पोहोचला आहे. या सगळ्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मशिदीतील लाऊडस्पीकर हटवण्यास विरोध केला आहे. मशिदीतील लाऊडस्पीकर काढून नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होता कामा नये, असं त्यांनी म्हटलं आहे. एवढेचं नाही तर मशिदीतील लाऊडस्पीकर हटवायला कोणी आले तर त्यांचा पक्ष मशिदीचे रक्षण करेल आणि लाऊडस्पीकर हटवण्यासही विरोध करेल, असेही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील आंबेडकर संस्कार भवनाच्या उद्घाटन समारंभाला रामदास आठवले पोहोचले होते. येथे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, 'मी नरेंद्र मोदींसोबत आहे. माझा पक्ष भाजपसोबत आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. मी म्हणालो लाऊडस्पीकर काढण्याबद्दल बोलू नका. जर तुम्हाला लाऊडस्पीकर लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता. तुम्ही तुमच्या मंदिरात लाऊडस्पीकर लावू शकता. हनुमान चालिसाचे पठण करू शकता. मात्र नवे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका.' (हेही वाचा - Navneet Rana and Ravi Rana Bail: नवनीत राणा, रवी राणा यांच्या जामीनावर मुंबई सत्र न्यायालयात 30 एप्रिलला सुनावणी)
सध्या यूपीपासून महाराष्ट्रापर्यंत लाऊडस्पीकरचा मुद्दा गाजत आहे. नुकतेचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींमधून 3 मेपर्यंत लाऊडस्पीकर हटवावेत, असा अल्टिमेटम दिला होता. मशिदींमधून लाऊडस्पीकर काढले नाही तर मनसे कार्यकर्ते राज्यभरातील मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण करतील, असे ते म्हणाले होते.
याशिवाय धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्याच्या निर्णयाबद्दल राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही कौतुक केले. धार्मिक स्थळांवरून विशेषत: मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवल्याबद्दल मी योगी सरकारचे मनापासून अभिनंदन आणि आभारी आहे, असे ट्विट राज ठाकरेंनी केले होते.
उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरून हटवले लाऊडस्पीकर -
यूपीमध्ये आतापर्यंत 21 हजार 963 लाऊडस्पीकर धार्मिक स्थळांवरून हटवण्यात आले आहेत. त्याचबरोबर 42332 धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे. यूपी सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने या मोहिमेसंदर्भात आतापर्यंत 29808 धर्मगुरूंशी चर्चा केली आहे आणि त्यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे चालवली जात आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)