Ujjain Rape Case: 12 वर्षाच्या मुलीवर उज्जैनमध्ये बलात्कार, रिक्षाचालकाला अटक, पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपी जखमी
या घटने अंतर्गत मोठी बातमी समोर आली आहे,
Ujjain Rape Case: उज्जैन (Ujjain) मधील बलात्कार (Rape) प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटने अंतर्गत मोठी बातमी समोर आली आहे, या घटनेतील आरोपी रिक्षा चालकाला पोलीसांनी अटक केली आहे. पोलीसांच्या ताब्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, आरोपी जखमी झाला आहे. पोलीसांनी घटनास्थळी नेण्यात आलं होत त्यावेळी तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी तो जखमी झाला. सध्या शहरातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
25 सप्टेंबर रोजी उज्जैनमध्ये 12 वर्षाच्या मुलीचा बलात्कार झाला. ती मदतीसाठी दारोदार नग्नअवस्थेत आणि रक्ताबंबाळ परिस्थीत फिरत होती. तीला कोणीही मदत केली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या घटनेमुळे देशात मोठी संताप पसरला आहे. संपुर्ण देशाला हादरवणाऱ्या या घटनेमुळे देशात मोठी खळबळ उडाली. पोलीसांनी या घटनेतील मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. रिक्षा चालकाला अटक केली आहे.
चौकशीदरम्यान मुख्य आरोपीची ओळख भरत सोनी अशी झाली. पोलिसांनी त्याला जीवनखेडी गावात घटनास्थळाच्या पाहणीसाठी नेले, तेथे त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याच्या पायात गोळी झाडली. तो खाली पडताच पोलिसांनी त्याला अटक करून उपचारासाठी रुग्णालयात नेले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मुलीच्या शरिरावर गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर बुधवारी इंदूरमधील मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.