UP CMO's Twitter Account Hacked: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाचे ट्विटर अकाउंट मध्यरात्री हॅक; काही तासांतच झाले पूर्ववत
अनेक युजर्सनी यूपी पोलिस, सीएम योगी आदित्यनाथ, सायबर पोलिस, एनआयएसह सर्व एजन्सींना ट्विट करून तक्रार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर खाते पुनर्संचयित करण्यात आले.
UP CMO's Twitter Account Hacked: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाचे ट्विटर अकाउंट (@CMOfficeUP) मध्यरात्री हॅक करण्यात आले. मात्र, शनिवारी सकाळपर्यंत ते पूर्ववत झाली. मात्र, राज्यप्रमुखाचे खाते हॅक होणे ही काही किरकोळ घटना नाही. अधिकारी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. शुक्रवार-शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री योगी यांच्या कार्यालयाचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आणि त्यांचा डिस्प्ले फोटो बदलण्यात आला. याशिवाय, बायोमध्ये सहसंस्थापक BoredApyc आणि Yugalabs असं टाकण्यात आलं.
अधिकृत खात्याशी छेडछाड झाल्याबद्दल लोकांनी यूपी पोलिसांकडे तक्रार करण्यास सुरुवात केली. अनेक युजर्सनी यूपी पोलिस, सीएम योगी आदित्यनाथ, सायबर पोलिस, एनआयएसह सर्व एजन्सींना ट्विट करून तक्रार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर खाते पुनर्संचयित करण्यात आले. (हेही वाचा - पाकिस्तानी दहशतवादी Mohammad Saeed याचा मुलगा Hafiz Talha Saeed याला भारत सरकारनं केलं दहशतवादी म्हणून घोषित)
सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सायबर तज्ज्ञांकडून या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. सीएमओचे ट्विटर अकाउंट दुपारी 12.30 वाजता हॅक झाले. सुमारे 40 मिनिटे खाते पुनर्संचयित केले जाऊ शकले नाही. त्यादरम्यान अनेकांना विचित्र ट्विट करून टॅग करण्यात आले. या सगळ्याशिवाय ट्विटर हँडलचे प्रोफाईल पिक्चरही बदलण्यात आले होते.
एखाद्या मोठ्या राजकीय व्यक्तीचे खाते हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याही खात्याशी छेडछाड करण्यात आली होती. रशिया आणि युक्रेनमधील युद्धासाठी हॅकर्सनी या खात्याच्या माध्यमातून देणग्या मागितल्या होत्या, मात्र त्यानंतर काही वेळातच हे खातेही पूर्ववत करण्यात आले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)