Tomato Prices Hike: OMG! कर्नाटकात 2500 किलो टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक हायजॅक; पोलिसांकडून आरोपी दाम्पत्याला अटक

महामार्गावरील दरोडेखोरांच्या मोठ्या टोळीचे ते सदस्य आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील चिक्काजाला येथील मल्लेश या शेतकऱ्याकडून 8 जुलै रोजी आरोपींनी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्याच्या ट्रकने आपल्याला धडक दिल्याचा दावा त्यांनी केला.

Tomato | representative pic- (photo credit -pixabay)

Tomato Prices Hike: सध्या देशभरात टोमॅटोचे दर (Tomato Price) गगनाला भिडले आहेत. अशातचं देशातील विविध भागांमधून टोमॅटो चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तामिळनाडूतील एका जोडप्याला बेंगळुरूमध्ये 2.5 टन टोमॅटो वाहून नेणाऱ्या ट्रकचे अपहरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पैसे उकळण्यासाठी दोघांनी आधी अपघात केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर अपहरणाची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाम्पत्य वेल्लोरचे रहिवासी आहेत. महामार्गावरील दरोडेखोरांच्या मोठ्या टोळीचे ते सदस्य आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील चिक्काजाला येथील मल्लेश या शेतकऱ्याकडून 8 जुलै रोजी आरोपींनी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्याच्या ट्रकने आपल्याला धडक दिल्याचा दावा त्यांनी केला. (हेही वाचा- Vegetable Price Today: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; पूर आणि पावसामुळे भाजीपाल्याच्या किंमती गगनाला भिडल्या, 40 टक्क्यांनी वाढले दर)

मल्लेश या शेतकऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी दाम्पत्याने त्याला मारहाण केली. त्यानंतर अडीच लाखांहून अधिक किमतीचा अडीच टन टोमॅटो घेऊन ट्रक घेऊन तो घटनास्थळावरून पळून गेला. नंतर, शेतकऱ्याच्या तक्रारीच्या आधारे, RMC यार्ड पोलिसांनी या टोळीचा माग काढला आणि शनिवारी भास्कर (28) आणि त्याची पत्नी सिंधुजा (26) यांना अटक केली, तर त्यांचे इतर तीन साथीदार अद्याप फरार आहेत.

आजकाल देशभरातील बाजारपेठेत टोमॅटोच्या किमती 100 रुपये प्रति किलोच्या पुढे गेल्या आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत असून, लोकांच्या जेवणातून टोमॅटोही गायब झाला आहे. पीडित शेतकरी मल्लेश हा कोलारच्या मंडईत टोमॅटो विक्रीसाठी घेऊन जात होता. मात्र, मध्येच तो फसवणुकीच्या घटनेचा बळी ठरला.