Hamida Banu Google Doodle: कोण होत्या हमिदा बानो? गुगलकडून मिळालं खास डूडल (See Photo)

गुगल डूडलकडून भारताची पहिला व्यवासायिक कुस्तीपटू हमीदा बानो यांना मान वंदना मिळाली आहे. 1940 आणि 50 च्या दशकात कुस्तीच्या पुरुष - प्रधान जगात प्रवेश करण्याच्या शक्यतांना झुगारून देणारी एक अग्रणी भारतीय महिला कुस्तीपटू हमीदा बानो यांचे स्मरण करते

Hamida Banu Google Doodle PC TWITTER

Hamida Banu Google Doodle: गुगल डूडलकडून भारताची पहिला व्यवासायिक कुस्तीपटू हमीदा बानो यांना मान वंदना मिळाली आहे. 1940 आणि 50 च्या दशकात कुस्तीच्या पुरुष - प्रधान जगात प्रवेश करण्याच्या शक्यतांना झुगारून देणारी एक अग्रणी भारतीय महिला कुस्तीपटू हमीदा बानो यांचे स्मरण करते. भारतातील पहिली व्यावसायिक महिला कुस्तीपटू म्हणून जगप्रसिध्द ओळख मिळाली. बानूने प्रचंड नाव कमावले. धाडसी वृत्तीमुळे त्यांना वृत्तपत्रकांनी अलिगडचा अॅमेझोन असं नाव दिलं. (हेही वाचा- फ्लॅट व्हाईट कॉफी गूगल डूडल)

बीबीसीच्या अहवालानुसार, फेब्रुवारी 1954 मध्ये, हमीदा बानू जेव्हा वयाच्या  30 वर्षाची झाली होती, त्यावेळीस तीनं जाहीर केलं की, जो कोणीही तिला कुस्तीच्या सामन्यात हरवू शकतो तो तिच्याशी विवाह बंधनात अडकणार. त्यानंतर तिने पटियाला आणि कोलकत्ता येथील दोन पुरुष चॅम्पियन्सचा पराभव केला. त्याच वर्षी तिसऱ्या सामन्यासाठी ती वडोदरा येथे गेली, तिथे तिने बाबा पहेलवानशी लढा दिला. तेथे दुसऱ्या पुरुष कुस्तीपटूने एका महिलेला सामोरे जाण्यास नकार दिल्याने माघार घेतली. बानूने अवघ्या 1 मिनिट 34 सेकंदात ही लढत जिंकली.

या काळात एका महिलेने कुस्ती खेळणं हे वादग्रस्त ठरलं होत. अनेकांनी तीच्यावर टीका केली. काहींनी दावा केला की,  तीचं कुस्ती  खेळणं हे पूर्व नियोजन करून असे त्यामुळे पुरुषांचा पराभव होत होता. त्यांच्यावर काही पुरुष गटांनी दगडफेक आणि मारहाण केलं, त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागला असं बीबीसी वृत्त संस्थेने वृत्त प्रसारित केले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement