IPL Auction 2025 Live

DTH चे बिल कमी येण्याची शक्यता, ट्राय कडून नवा नियम लवकरच होणार जाहीर

ग्राहकांना आता दिलासा देण्यासाठी DTH चे बिल कमी येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

ग्राहकांना आता दिलासा देण्यासाठी DTH चे बिल कमी येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ट्रायने या नव्या नियमासंबंधित काम सुरु केले असून येत्या दिवसात चॅनेलच्या नुसार ग्राहकांना पैसे द्यावे लागणार आहेत.

तर ET ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्राय डीटीएच संबंधित नवा नियम लागू करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे केबल धारकांचे बिल कमी येणार आहे. मात्र सध्या ग्राहकांसाठी लागू करण्यात आलेल्या चॅनलच्या पॅकच्या दरांमुळे नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे हे दर कशा पद्धतीन कमी करता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. म्हणून नवा नियम लागू झाल्यानंतर सध्याच्या नियमातसुद्धा बदल करता येणार आहे.(TRAI New DTH Rules: निवडीचे स्वातंत्र्य घ्या! अन्यथा तुमचा आवडता टीव्ही चॅनल होईल बंद)

परंतु काही केबलधारकांच्या मते ट्रायकडे चॅनलच्या प्लॅन दरात बदल करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. मात्र काही जणांनी तो अधिकार फक्त ट्रायकडे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कोणत्याही चॅनलला 19 रुपयांपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही.