Haryana Bus Fire: हरियाणातील नूह येथे पर्यटक बसला आग; 8 जणांचा मृत्यू, 24 जखमी
दुर्दैवाने, आठ प्रवासी जिवंत जळाले आणि इतर दोन डझनहून अधिक जण गंभीर भाजले. त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Haryana Bus Fire: हरियाणातील (Haryana) नूह (Nuh) जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. कुंडली मानेसर पलवल द्रुतगती मार्गावर रात्री उशिरा भाविकांनी भरलेल्या बसला आग (Fire) लागली. त्यामुळे काही वेळातच बस पूर्णपणे जळून खाक झाली. दुर्दैवाने, आठ प्रवासी जिवंत जळाले आणि इतर दोन डझनहून अधिक जण गंभीर भाजले. त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, बळी गेलेले चंदीगड आणि पंजाबचे रहिवासी असून ते मथुरा आणि वृंदावन यात्रेहून परतत होते.
तावडू शहराजवळ लहान मुले आणि महिलांसह सुमारे 60 जणांना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक आग लागली. या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना सरोज या प्रवाशाने सांगितले की, आम्ही पर्यटक बस भाड्याने घेतली होती. आम्ही बनारस, मथुरा आणि वृंदावनला भेट देण्यासाठी निघालो. आम्हाला बसच्या मागील बाजूस आग लागल्याचे दिसले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. (हेही वाचा - Courtallam Waterfalls Flood: धबधब्याला पूर आल्याने 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तामिळनाडू येथील घटना (Wacth Video))
ही घटना पाहणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी आरडाओरड करून चालकाला अपघाताचा इशारा दिला. अखेर दुचाकीवरून पाठलाग करणाऱ्या तरुणाच्या मदतीने बस थांबवण्यात आली. मात्र, आग विझवण्याचे आणि आत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करूनही आठ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे 24 जण गंभीररीत्या भाजले.
पहा व्हिडिओ -
दुसरीकडे, माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते. मृत्यू आणि जखमींना दुजोरा देताना पोलिस अधीक्षक नरेंद्र बिजारानिया म्हणाले की, मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही आणि पोलिस त्यांचा तपास घेत आहेत.