IPL Auction 2025 Live

Operation Ajay: इस्रायलमधील 197 भारतीयांची तिसरी तुकडी नवी दिल्ली पोहोचली; चौथे विमान तेल अवीवहून भारतासाठी रवाना

गुरुवारपासून भारतीयांची नोंदणी सुरू झाली.

Operation Ajay (PC - Twitter)

Operation Ajay: ऑपरेशन अजयचे चौथे विमान शनिवारी रात्री उशिरा इस्रायल (Israel) मधील तेल अवीव (Tel Aviv) येथून भारतासाठी रवाना झाले. चौथ्या विमानात 274 भारतीय नागरिक आहेत, ज्यांना भारतात आणले जात आहे. तत्पूर्वी, या ऑपरेशनचे तिसरे विमान शनिवारी रात्री उशिरा इस्रायलहून दिल्ली विमानतळावर पोहोचले. या विमानात 197 भारतीय नागरिक होते. त्यांना इस्रायलमधून सुखरूप परत आणण्यात आले. ऑपरेशन अजय अंतर्गत आतापर्यंत 644 लोकांना भारतात आणण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, इस्रायलहून भारतासाठी रवाना होणारी ही एका दिवसातील दुसरी फ्लाइट आहे. जयशंकर यांनी X वर पोस्ट केले की, ऑपरेशन अजयची दुसरी फ्लाइट, 274 प्रवाशांना घेऊन तेल अवीव येथून निघाली आहे. (हेही वाचा - Israel-Hamas War: एका हातात इस्रायलमधून अपहरण केलेली मुलं, दुसऱ्या हातात रायफल; हमासच्या दहशतवाद्यांनी जारी केला व्हिडिओ, Watch

इस्रायलमध्ये अडकलेल्या सुमारे 18,000 भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन अजय सुरू केले आहे. गुरुवारपासून भारतीयांची नोंदणी सुरू झाली. या हल्ल्याला एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे, ज्यामध्ये 1,300 हून अधिक इस्रायली ठार झाले आहेत, तर 1,000 हून अधिक पॅलेस्टिनी देखील इस्रायली प्रत्युत्तरादाखल मारले गेले आहेत.

हमास आणि इस्रायलमधील वाढता संघर्ष पाहता परराष्ट्र मंत्रालयाने 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्ष भारतीयांना माहिती आणि सहाय्य प्रदान करण्यात मदत करत आहे. याआधी, 'ऑपरेशन अजय' अंतर्गत, इस्रायलमधून 197 भारतीय नागरिकांना घेऊन तिसरे विमान दिल्लीला पोहोचले.