IPL Auction 2025 Live

Azamgarh Rape Case: उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराच्या घटनेत पीडितेला न्याय न मिळाल्याने पोलिस स्टेशनमध्ये संपवले जीवन, मृत्यूनंतर प्रशानसाला आली जाग

पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास विलंब केल्याने बलात्कार पीडित मुलगी अस्वस्थ झाल्याचा आरोप आहे.

Image Used for Representational Purpose Only. (Photo Credits: ANI)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आझमगड (Azamgarh) जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराच्या (Rape) आरोपात एका 55 वर्षीय महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास विलंब केल्याने बलात्कार पीडित मुलगी अस्वस्थ झाल्याचा आरोप आहे. महिलेने विष प्राशन (Poison) केल्याची घटना शनिवारी घडली. त्यांना कोणतीही सुसाईड नोट (Suicide note) सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्टेशन हाऊस ऑफिसरला निलंबित केले आहे. तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, असे पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार समजले आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी उत्तर प्रदेश सरकारवर सडकून टीका केली असून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस अधीक्षक सुधीर कुमार यांच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या पतीने आरोप केला की, त्यांच्या पत्नीवर अनिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीने बलात्कार केला पण पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. हेही वाचा Odisha Crime: ओडिशामधील श्री जगन्नाथ मंदिरात 12 वर्षीय मुलीचा विनयभंग, प्रकरणी पुजाऱ्याला अटक

महिलेच्या पतीने दावा केला आहे की त्याच्या पत्नीने पोलिस स्टेशनमध्ये आपले जीवन संपवले आहे. परंतु पोलिसांनी त्यांच्या परिसरात ही घटना घडल्याची मान्य केली नाही. एसपी म्हणाले एसएचओला निलंबित करण्यात आले आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी दावा केला की त्यांनी अनेक वेळा न्यायासाठी पोलिसांकडे धाव घेतली होती. परंतु त्यांची याचिका बधिरांच्या कानावर पडली.

कुटुंबाने सांगितले की, बलात्कार पीडितेने शनिवारी पोलिस स्टेशन गाठले आणि विष प्राशन करून तिचे आयुष्य संपवले. महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिला मृत घोषित करण्यात आले. पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी राज्यातील भाजप सरकारवर टीका केली आहे.

या प्रकरणी त्यांनी ट्विट केले, आझमगढमध्ये, बलात्काराच्या आरोपींवर कारवाई न झाल्याने दुखावलेल्या, एका महिलेने पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या केली आहे. हे खुप दु:खद घटना आहे. तसेच ही घटना भाजप सरकारच्या तोंडावर एक थप्पड आहे. जे सामान्य माणसाला न्याय देण्याचे मोठे दावे करते. सरकारने दोषी पोलीस अधिकारी आणि आरोपींवर कठोर कारवाई केली पाहिजे, असे एसपी प्रमुख म्हणाले.