UAE Ban Indigo Plane: युएईने 24 ऑगस्टपर्यंत इंडिगोच्या उड्डाणांना दिली स्थगिती, जाणून घ्या कारण

इंडिगोनेही या बातमीला सहमती दर्शवली आहे. इंडिगोने म्हटले आहे की, ऑपरेशनल समस्यांमुळे यूएईला जाणारी इंडिगोची सर्व उड्डाणे 24 ऑगस्ट 2021 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत.

IndiGo Aircraft | Representational Image (Photo Credits: ANI)

संयुक्त अरब अमिराती (UAE) ने 24 ऑगस्ट पर्यंत इंडिगो (Indigo) विमानांचे (Plane) उड्डाणे स्थगित केली आहेत. इंडिगोनेही या बातमीला सहमती दर्शवली आहे. इंडिगोने म्हटले आहे की, ऑपरेशनल समस्यांमुळे यूएईला जाणारी इंडिगोची सर्व उड्डाणे 24 ऑगस्ट 2021 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. त्याचवेळी अहवालात म्हटले आहे की यूएईने एका आठवड्यासाठी विमान कंपनीवर बंदी घातली आहे.  कारण इंडिगोच्या अनेक प्रवाशांना (Passengers) विमानतळावर (Airport) अनिवार्य RT-PCR चाचणी मिळाली नाही. यूएईने भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, नायजेरिया आणि युगांडामधील प्रत्येक प्रवाशांना प्रवासाच्या 48 तास आधी आरटी-पीसीआर चाचणी आणि विमानाच्या काही तास आधी विमानतळावर दुसरी रॅपिड-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य केले होते.

भारताच्या विमानतळावर कोविड 19 चाचणी न घेतलेल्या प्रवाशांना इंडिगोच्या फ्लाइटमध्ये कथितरीत्या नेण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे यूएईने 24 ऑगस्टपर्यंत विमानसेवेवर एका आठवड्यासाठी बंदी घातली आहे. ही बंदी 17 ऑगस्टपासून लागू झाली आहे. इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, आखाती देशासाठी सर्व उड्डाणे ऑपरेशनल समस्यांमुळे रद्द करण्यात आली आहेत.

ऑपरेशनल समस्यांमुळे, यूएईसाठी इंडिगोची सर्व उड्डाणे 24 ऑगस्ट 2021 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत, असे एअरलाईनने आपल्या निवेदनात म्हटले आहे.आम्ही आमच्या सर्व प्रवाशांना सूचित केले आहे आणि ते पुन्हा उड्डाण सुरू झाल्यावर त्यांच्या जागा परत किंवा समायोजित करण्याचा प्रयत्न करू.असे इंडिगोने स्पष्ट केले आहे. तसेच यानंतर प्रवाशांना यूएईत जाताना अधिकाऱ्यांकडून मंजुरी पत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. विमानतळावरील एअरलाईन चेक-इन कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना फ्लाइटमध्ये प्रवेश देण्यापूर्वी चाचणी अहवाल तपासणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे आगमनानंतर यूएई विमानतळावर तपासली जातील. हेही वाचा SPPU कडून फी कपातीचा निर्णय; COVID-19 मुळे आई-वडील गमावलेल्यांना 100% फी कपात

तर दुसरीकडे कतारच्या आरोग्य मंत्रालयाने बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान, फिलिपिन्स, श्रीलंका येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना विषाणूबाबत नवीन नियम जारी केले आहेत . नवीन नियमांनुसार, ज्या प्रवाशांना कतारमध्ये कोरोनाची लस मिळाली आहे. कोरोना व्हायरसमधून बरे झाले आहेत.तसेच  ज्यांनी या देशांमध्ये प्रवास केला आहे, त्यांना दोन दिवस हॉटेल क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. पीसीआर चाचणीचा नकारात्मक परिणाम दुसऱ्या दिवशी आल्यानंतर अलग ठेवणे समाप्त केले जाईल.



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

PIL Seeks Pornography Ban, Castration of Rapists: महिला सुरक्षेच्या प्रश्नावर जनहित याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने पाठवली राज्य, केंद्र सरकारला नोटीस

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना