PM Modi On Oscar Award Winners: ऑस्कर पुरस्कार जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी Naatu Naatu च्या संपूर्ण टीमचे केले अभिनंदन; म्हणाले, 'हे गाणं पुढील अनेक वर्षे लक्षात राहील'

पुढील अनेक वर्षे स्मरणात राहणारे हे एक गाणे असेल.

PM Narendra Modi (Pic Credit - ANI)

PM Modi On Oscar Award Winners: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोमवारी भारतीय चित्रपट 'RRR' च्या संपूर्ण टीमचे 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. आज संपूर्ण देशाला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींनी नाटू नाटू टीमचे अभिनंदन करताना म्हटलं आहे की, 'असाधारण! नाटू नाटूची लोकप्रियता जागतिक आहे. पुढील अनेक वर्षे स्मरणात राहणारे हे एक गाणे असेल. या प्रतिष्ठित सन्मानासाठी एमएम कीरावानी, चंद्र बोस आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन. भारताला आनंद आणि अभिमान आहे.' (हेही वाचा - Oscars 2023: ऑस्कर सोहळ्यात 'नाटू-नाटू' गाण्यावर अमेरिकन डान्सर्सनी केला धमाकेदार डान्स, पहा व्हिडिओ)

दुसर्‍या ट्विटमध्ये, त्यांनी द एलिफंट व्हिस्पर्सच्या निर्मात्यांचे कौतुक केले आणि म्हटले आहे की, 'गुनीत मोंगा, कार्तिक गोन्साल्विस आणि 'द एलिफंट व्हिस्पर्स'च्या संपूर्ण टीमचे या सन्मानाबद्दल अभिनंदन. त्यांचे कार्य शाश्वत विकास आणि निसर्गाशी सुसंगत राहण्याचे महत्त्व आश्चर्यकारकपणे अधोरेखित करते.'