Explosives Found In Jammu's Gharota: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कट उधळला; मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त

यानंतर दहशतवाद्यांची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. लष्कराची शोध मोहीम अजूनही सुरू आहे.

Explosives Found In Jammu's Gharota (फोटो सौजन्य - ANI)

Explosives Found In Jammu's Gharota: भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. शस्त्रांचा एवढा मोठा साठा पाहून दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. जम्मूतील घरोटा (Gharota) येथील रिंग रोडजवळ संशयास्पद स्फोटके सापडल्यानंतर भारतीय लष्कराने शोध मोहीम तीव्र केली. यानंतर दहशतवाद्यांची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. लष्कराची शोध मोहीम अजूनही सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, भारतीय लष्कराच्या रोमियो फोर्सने जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील झुल्लास भागात शस्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. लष्कराच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुप्त माहितीच्या आधारे शोध सुरू करण्यात आला आणि एका संशयित दहशतवाद्याच्या बॅगमधून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये एके 47 रायफल आणि पाकिस्तानी वंशाच्या पिस्तूल आणि आरसीआयईडी, टाइम्ड डिस्ट्रक्शन आयईडी, स्टोव्ह आयईडी, आयईडीसाठी स्फोटके आणि चिनी ग्रेनेड यांसारख्या स्फोटकांचा समावेश आहे. (हेही वाचा - Terrorists Killed In Encounter at Jammu-kashmir: जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार)

दहशतवाद्यांच्या बॅगमध्ये सापडली शस्त्रे -

लष्कराला मिळालेल्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे शनिवारी झुलास भागात भारतीय सैन्याच्या रोमियो फोर्सने एक मोठी शोध मोहीम सुरू केली. जिथे शोध दरम्यान, दहशतवाद्यांची एक संशयित बॅग सापडली, ज्यामध्ये एके 47 पिस्तुल राउंड्स आणि आरसीआयईडी, टाइम्ड डिस्ट्रक्शन आयईडी, स्टोव्ह आयईडी, आयईडीसाठी स्फोटक आणि चिनी ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. (हेही वाचा -

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जप्त केलेली सर्व शस्त्रे आणि स्फोटके परिपूर्ण स्थितीत होती आणि दहशतवाद्यांच्या वापरासाठी तयार होती. दरम्यान, ही कारवाई अजूनही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, जम्मूतील घरोटा येथील रिंगरोडजवळ पोलिस आणि लष्कराच्या गस्तीला एक संशयित स्फोटक सापडले होते. नंतर बॉम्ब शोधक पथकाने संशयित स्फोटक नष्ट केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif