Hyderabad Shocker: हैदराबादमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांची आत्महत्या; नैराश्येतून उचलले भीषण पाऊल

एकाच कुटुंबातील चार जणांनी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

Hyderabad Shocker: हैदराबादमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांची आत्महत्या; नैराश्येतून उचलले भीषण पाऊल
Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

Hyderabad Shocker: हैदराबादच्या कुशाईगुडा भागात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या (Suicide) केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील चारही सदस्यांचे मृतदेह अपार्टमेंटमध्ये आढळून आले. एकाच कुटुंबातील चार जणांनी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

सतीश, त्याची पत्नी वेधा आणि त्यांची दोन मुले निशिकेश (9) आणि निहाल (5) अशी मृतांची नावे आहेत. अधिका-यांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी रात्री घडल्याचा संशय आहे. मात्र पोलिसांना शनिवारी दुपारी याची माहिती मिळाली. त्यानंतर सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. (हेही वाचा - Ghaziabad Shocker: पत्नी सासऱ्यांच्या अंत्यसंस्काराला आली नाही, संतापलेल्या पतीने केली हत्या)

नैराश्येतून कुटुंबाची आत्महत्या -

कांडीगुडा भागात वडील, आई आणि त्यांच्या दोन मुलांनी विष प्राशन करून आत्महत्या केली, असे कुशाईगुडा पोलिस स्टेशनचे एसएचओ पी व्यंकटेश्वरलू यांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की दोन्ही मुले आरोग्याच्या समस्यांमुळे अस्वस्थ होते. उपचार करूनही मुले बरी होत नव्हती. त्यामुळे आई-वडील नैराश्यात गेले. त्यानंतर कुटुंबाने आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली.

एसएचओ पी व्यंकटेश्वरलू यांनी सांगितले की, मृतांचे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत. अद्याप शवविच्छेदन झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 26, 2023 09:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).