Stone Pelting at Swatantra Express: स्वतंत्र सेनानी एक्सप्रेसवर दगडफेक; अनेक बोगींच्या काचा फुटल्या, प्रवासी जखमी

अनेक डब्यांच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

Photo Credit- X

Stone Pelting at Swatantra Express: बिहारच्या समस्तीपूरमध्ये स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस (Swatantra Senani Express) ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. समस्तीपूर जवळच अक्सप्रेस आली असताना काही माथेफिरूंनी ही प्रकार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी रात्री समस्तीपूर स्थानकाच्या सिग्नलवर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीमुळे(Stone Pelting at Train) अनेक डब्यांच्या काचा फुटल्या आहेत. स्लीपर कोच(Sleeper Coach)च्या डब्यांमध्ये ही दगडफेक करण्यात आली. जखमी प्रवाशांवर समस्तीपूरमध्येच उपचार करण्यात येत आहेत. घटनेनंतर ट्रेन सुमारे 45 मिनिटे उशिराने मुझफ्फरपूर स्टेशनवर पोहोचली. (हेही वाचा:Stone Pelting on Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा तुटल्या, छत्तीसगडमध्ये ट्रायल रनदरम्यान घडली घटना )

ट्रेन नवी दिल्लीला जात होती

गुरुवारी रात्री मुजफ्फरपूर-समस्तीपूर रेल्वे सेक्शनवर जयनगरहून नवी दिल्लीला जाणाऱ्या स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. रात्री ९.४५ च्या सुमारास रेल्वेवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीमुळे अनेक प्रवासी घाबरले, जखमीही झाले. दगडफेकीनंतर समस्तीपूरमध्ये ट्रेन काही काळ थांबली, त्यानंतर ट्रेन मुझफ्फरपूरकडे रवाना झाली.

अज्ञात माथेफिरूंविरोधात एफआयआर दाखल

सिग्नलवर पोहोचताच अज्ञात लोकांनी एक्सप्रेसवर दगडफेक सुरू केली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे प्रवासी भयभीत झाले. या घटनेनंतर ट्रेन बराच वेळ थांबली होती. ट्रेन 45 मिनिटांच्या विलंबाने मुझफ्फरपूर जंक्शनवर पोहोचली. या दगडफेकीमुळे रेल्वेच्या अनेक बोगींच्या काचा फुटल्या. यामध्ये पँट्री कारला लागून असलेल्या B1 आणि B2 डब्यांच्या काचा फुटल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय अनेक स्लीपर कोचच्या खिडक्यांवरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे ट्रेनमध्ये अनेक प्रवासी जखमी झाले. सध्या आरपीएफ समस्तीपूरने अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif