Stone Pelting on Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा तुटल्या, छत्तीसगडमध्ये ट्रायल रनदरम्यान घडली घटना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ट्रेन सुरू होणार आहे. माज्ञ, त्या आधीच एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली.

Photo Credit- X

Stone Pelting on Vande Bharat Express: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी छत्तीसगडमधील दुर्ग ते आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणमपर्यंत धावणाऱ्या वंदे भारत ट्रेन(Vande Bharat Express)ला हिरवा झेंडा दाखवून तिचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, त्या आधीच शनिवारी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना घडली(Stone Pelting on Vande Bharat Express) आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी विशाखापट्टणमहून परतत असताना बागबहारा रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा: Vande Bharat Trains: लवकरच सुरु होणार Pune-Hubli आणि Kolhapur-Pune मार्गावर आठ डब्यांच्या वंदे भारत गाड्या; जाणून घ्या वेळा, थांबे आणि इतर तपशील)

सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र ट्रेनच्या तीन डब्यांच्या खिडक्यांचे नुकसान झाले आहे. शिवकुमार बघेल, देवेंद्र कुमार, जीतू पांडे, सोनवाणी आणि अर्जुन यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी सी2-10, सी4-1, सी9-78 या ट्रेनच्या तीन डब्यांच्या खिडक्या फोडल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपींविरुद्ध बागबहारा येथे 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकची माहिती अशी की, दुर्ग ते विशाखापट्टणम वंदे भारत ट्रेन व्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी सोमवारी टाटानगर ते पाटणा, नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे, आग्रा कँट ते बनारस आणि पुणे ते हुबली या मार्गांवरील वंदे भारत ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवणार आहेत.