Shivaji Maharaj Jayanti 2019: शिवाजी महाराज जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवरायांचरणी नतमस्तक (Video)
या जयंतीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवरायांचरणी नतमस्तक झाले आहेत.
आज जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती. या जयंतीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शिवरायांचरणी नतमस्तक झाले आहेत. ट्विटवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले. शिवजयंती हा उत्सव 19 फेब्रुवारीला साजरा करण्याची सुरूवात कशी आणि कधी झाली?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ ट्विट करत लिहिले की, "शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. शिवाजी महाराज सत्य आणि न्यायप्रिय असे आदर्श राजे होते. ते खरे देशभक्त होते. गरीब, तळागाळातील लोकांनाही ते आपलेसे वाटतं." (छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते गुण तुम्ही पुढील पिढीला द्याल?)
तर व्हिडिओत नरेंद्र मोदी म्हणतात की, "आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. त्यांचे व्यक्तीमत्त्व बहुआयामी होते. ज्यांनी सुशासन आणि प्रशासन प्रस्थापित करुन देशाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. अनेक संकटांना सामोरे जात, संघर्ष करत त्यांनी योग्यता आणि क्षमतेच्या आधारावर सुव्यवस्थित प्रशासन प्रस्थापित केले. विश्वाच्या इतिहासात अशी व्यक्ती सापडणे असंभव आहे."
"सातत्याने येणाऱ्या संकटातही त्यांनी सुव्यवस्थित प्रशासनाची परंपरा सुरु ठेवली. जसे भगवान रामाने लहान लहान वानरांची सेना बनवून लढाई जिंकली. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनीही लहान लहान मावळ्यांना सोबत घेऊन, प्रशिक्षण देऊन युद्धासाठी तयार केले. हे खूप मोठे संघटन कौशल्य आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या जयघोषात हा व्हिडिओ संपतो."
आज देशभरात शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत शिवजयंतीचा सोहळा साजरा करण्यात येईल.