Jaipur-Mumbai Train Shooting: 'मी स्वत:लाही गोळ्या घालू का?' जयपूर-मुंबई ट्रेनध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यासह 4 जणांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर चेतनसिंग चौधरीने पत्नीला केला होता प्रश्न
प्रियांका चौधरीने निवेदनात म्हटले आहे की, गोळीबाराच्या घटनेच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता तिच्या पतीने फोन करून आपल्या खुनी कृत्याबद्दल तिला सांगितले होते.
Jaipur-Mumbai Train Shooting: एका वरिष्ठ सहकाऱ्यासह मुंबईजवळ एका ट्रेनमध्ये चार जणांची कथित गोळीबार केल्यानंतर काही क्षणांनी, रेल्वे संरक्षण दल (RPF) चे हवालदार चेतनसिंह चौधरी (Chetansinh Chaudhary) यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता. तसेच त्यांनी आपल्या पत्नीला आपण मोठी चूक केल्याचं म्हणत 'मी स्वत:लाही गोळ्या घालू का?' असा प्रश्न केला होता. चौधरी यांची पत्नी प्रियंका हिने जुलैच्या घटनेनंतर पोलिसांना दिलेल्या निवेदनात हा खुलासा केला आहे. चेतनसिंह चौधरी यांच्या पत्नीने सांगितलं की, आरोपीच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी झाली होती. यासाठी ते औषध घेत होते. जीआरपीने 20 ऑक्टोबर रोजी येथील दंडाधिकारी न्यायालयात चेतन चौधरी (34) विरुद्ध आरोपपत्र दाखल केले. चेतन चौधरीने 31 जुलै रोजी पालघर रेल्वे स्थानकाजवळ पालघर रेल्वे स्थानकाजवळ एका वरिष्ठ सहकाऱ्याला आणि तीन प्रवाशांना चालत्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळ्या घालून ठार केलं होतं.
त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 302 (हत्या), 153-A (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि इतर तसेच संबंधित अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियांका चौधरीने निवेदनात म्हटले आहे की, गोळीबाराच्या घटनेच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता तिच्या पतीने फोन करून आपल्या खुनी कृत्याबद्दल तिला सांगितले होते. (हेही वाचा -Breaking News: मुकेश अंबांनीना जीवे मारण्याची धमकीचा ईमेल, पोलिसात अज्ञाताविरुध्दात गुन्हा दाखल)
दरम्यान, यानंतर चेनच्या पत्नीने त्याला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. प्रियंकाने सांगितलं की, तिच्या पतीचे वडील, जे आरपीएफमध्ये होते, त्यांचे 2007 मध्ये कर्तव्यावर असताना निधन झाले. चेतन चौधरी तेव्हा 10 वीत शिकत होते. 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, चेतन चौधरी नुकसान भरपाईच्या कारणास्तव आरपीएफमध्ये रुजू झाले आणि त्यांची नियुक्ती उज्जैन, मध्य येथे झाली.
दरम्यान, 2018 मध्ये, त्याची गुजरातमध्ये बदली झाली. जिथे ते पोरबंदरच्या किनारी शहराजवळील राडावाव नावाच्या गावात राहिले. या वर्षी एप्रिलमध्ये चेतनची बदली मुंबईत करण्यात आली होती. जेव्हा चेतनची आई पोरबंदरमध्ये चेतन चौधरीला भेटायला गेली तेव्हा तिला त्याचे वर्तन असामान्य आढळले, असंही प्रियंकाने आपल्या निवेदनात नमूद केलं आहे.
यावर्षी 13 फेब्रुवारी रोजी चेतन चौधरी यांना उत्तर प्रदेशातील मथुरा येथील न्यूरोसर्जनकडे नेण्यात आले. प्राथमिक चाचण्या आणि एमआरआय केल्यानंतर, त्याच्या मेंदूमध्ये रक्त गोठल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी दहा दिवस औषधे दिली. पहिल्या कोर्सनंतर, जेव्हा डॉक्टरांनी त्याची पुन्हा तपासणी केली तेव्हा त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा दिसून आली. त्यामुळे त्यांना तीच औषधे सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता.
चेतन चौधरीच्या काकांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरोपीची पोरबंदरहून मुंबईत बदली झाल्याने तो अस्वस्थ झाला होता, तर त्याला मथुरा किंवा आग्रा येथे पोस्टिंग हवी होती. आरोपपत्रात जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसच्या सहप्रवाशांसह अनेक साक्षीदारांचे जबाब आहेत, जिथे ही भीषण घटना घडली. चार जणांना ठार मारल्यानंतर, आरपीएफ पोलिसांनी दुसर्या प्रवाशाला “जय माता दी' अशी घोषणा दे नाहीतर गोळ्या घालण्याची धमकी दिली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)