SBI ATM Withdrawal Rules: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (State Bank Of India)एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये (ATM Withdrawal Rules) मोठा बदल केला आहे.

Image used for representational purpose. (Photo Credit: File)

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (State Bank Of India)एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये (ATM Withdrawal Rules) मोठा बदल केला आहे. मेट्रो शहरातील नियमित बचत खातेधारकांना एटीएममधून महिन्यात केवळ आठ वेळा मोफत ट्रॅन्झॅक्शन करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे, मोफत ट्रान्झेक्शन मर्यादा संपल्यानंतर त्यापुढी ट्रान्झेक्शनसाठी खातेदारांकडून शुल्क आकरले जाणार आहेत, अशी माहिती एसबीआयने आपल्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर देण्यात आली आहे. ज्यामुळे एसीबीआयच्या करोडो ग्राहकांना मोठा झटका लागला आहे. हे देखील वाचा- TikTok-Reliance Jio Deal: भारतातील ByteDance कंपनीचा व्यवहार मुकेश अंबानी यांच्या रिलायंस जिओ ला विकण्याची शक्यता - Report

एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्याचे नवीन नियम-

- स्टेट बॅंक ऑफ इंडिया मेट्रो शहरांमधील खातेदारांना एका महिन्यात 8 वेळा विनाशुल्क काढण्याची मुभा देते. मात्र, यानंतरच्या ट्रान्झेक्शनसाठी शुल्क आकारले जाणार आहेत.

- तसेच गैर मेट्रो शहरांमध्ये एसबीआयच्या खातेदारांना 10 वेळा एटीएममधून विनाशुल्क पैसे काढता येणार आहे. यामध्ये महिन्यात 5 वेळा एसबीआयच्या एटीएममधून तर, इतर 5 वेळेस अन्य बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढता येणार आहे. यानंतर खातेदारांकडून 10 ते 20 रुपये शुल्क आकारला जाणार आहे.

- खातेदारांना एटीएममधून जेवढे पैसे काढायचे आहेत, तेवढे पैसे त्यांच्या खात्यात असणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे, ट्रान्झेक्शन फेल झाल्यास खातेदारांकडून 20 दंड आकारला जाणार आहे.

- याशिवाय एटीमधून 10 हजारांहून अधिक पैसे काढायचे असल्यास खातेदाराला ओटीपी पाठवला जाणार आहे. त्यानंतरच पेसै काढता येणार आहे. ही सुविधा रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमी अगोदरच नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच एसबीआयने आपल्या नियमात केलेल्या नव्या बदलांमुळे नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.