Woman Burnt Alive After Bus Catches Fire: तेलंगणात चालत्या बसला आग, महिलेचा होरपळून मृत्यू; 4 प्रवासी जखमी
हैदराबादहून चित्तूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची व्होल्वो बस पलटी झाली आणि बसने पेट घेतला. बसमध्ये 40-50 प्रवासी होते. बसला आग लागल्यावर जवळपास सर्वच प्रवाशांनी खिडक्या तोडून बाहेर उड्या मारल्या.
Woman Burnt Alive After Bus Catches Fire: तेलंगणातील (Telangana) जोगुलांबा गडवाल जिल्ह्यात (Jogulamba Gadwal District) शनिवारी सकाळी मोठा अपघात झाला. येथे एका खासगी बसला लागलेल्या आगीत (Bus Catches Fire) एक महिला जिवंत जळाली (Woman Burnt Alive) तर अन्य चार प्रवासी जखमी झाले. हैदराबाद-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील एररावल्ली चौकाजवळ आज पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. हैदराबादहून चित्तूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची व्होल्वो बस पलटी झाली आणि तिने पेट घेतला. बसमध्ये 40-50 प्रवासी होते. बसला आग लागल्यावर जवळपास सर्वच प्रवाशांनी खिडक्या तोडून बाहेर उड्या मारल्या.
महिलेचा जळून मृत्यू -
या अपघातात एक महिला जिवंत जळाली. तसेच चार प्रवासीही जखमी झाले. यातील तिघांना गडवाल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर चौथ्याला हैदराबादला हलवण्यात आले आहे. (हेही वाचा - Tamil nadu Fire: तामिळनाडू येथील इलेक्ट्रॉनिक्स गोदामाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही)
पहा व्हिडिओ -
VIDEO | A private bus caught fire near Telangana's Erravalli village, killing one and injuring five. The injured were taken to Kurnool Hospital. pic.twitter.com/QA8WagzjRx
— Press Trust of India (@PTI_News) January 13, 2024
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. चालकाला गाडी चालवताना झोप लागल्याने हा अपघात झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2024 01:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

