Rajyasabha MP Oath Ceremony:  शरद पवार, उदयनराजे भोसले, रामदास आठवले पुन्हा खासदार; राजीव सातव यांचा दिल्लीत मराठी बाणा

महाराष्ट्रातील खासदारांनी शपथ घेतलेल्यांपैकी शरद पवार- राष्ट्रवादी काँग्रेस, उदयनराजे भोसले- भाजप, प्रियंका चतुर्वेदी-शिवसेना, डॉ. भागवत कराड -भाजप, राजीव सातव- काँग्रेस पक्षाचे आहेत.

Rajyasabha MP Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन आदी कारणामुळे लांबणीवर पडलेला राज्यसभेच्या नवनियुक्त खासदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती सभापती व्यंकय्या नायडू(Venkaiah Naidu) यांच्या दालनामध्ये झाला. या वेळी महाराष्ट्रातील शरद पवार (Sharad Pawar), उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale), प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi), डॉ. भागवत किशनराव कराड (Dr. Bhagwat Karad), राजीव सातव (Rajiv Satav) आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी खासदार पदाची शपथ घेतली. कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका ओळखून सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करत हा सोहळा पार पडला. महाराष्ट्रातील खासदारांसोबतच देशातील इतर राज्यांतील नवनियुक्त सदस्यांनीही राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. उल्लेखनीय असे की मराठी बाणा कायम ठेवत काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी मराठीमध्ये शपथ घेतली.

महाराष्ट्रातील खासदारांनी शपथ घेतलेल्यांपैकी शरद पवार- राष्ट्रवादी काँग्रेस, उदयनराजे भोसले- भाजप, प्रियंका चतुर्वेदी-शिवसेना, डॉ. भागवत कराड -भाजप, राजीव सातव- काँग्रेस पक्षाचे आहेत. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2020: महाराष्ट्रातून सातही उमेदवार बिनविरोध; रामदास आठवले, शरद पवार, उदयनराजे भोसले, राजीव सातव यांसह दिग्गजांचा समावेश)

देशात कोरोना व्हायरस संकट दाखल झाल्याच्या काही दिवसानंतर स्थगित करुन पुढे ढकलण्या आलेले कामकाज आज पुन्हा सुरु करण्यात आले. मात्र, राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने संसदेचे कामकाज सुरु झाले. राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी देशभरातून एकूण 62 खासदार निवडूण देण्यात आले. त्यातील काही खासदार प्रत्यक्ष निवडणूकीतून तर काही बिनविरोध निवडून देण्यात आले. (हेही वाचा, Rajyasabha MP Oath Ceremony: शरद पवार, रामदास आठवले, छत्रपती उदयनराजे भोसले, राजीव सातव आदी नेते घेणार खासदारकीची शपथ)

प्रामुख्याने महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार निवडणूक बिनविरोध पार पडली. दरम्यान, आज निवडलेल्या एकूण 62 पैकी काही मोजक्याच खासदारांनी शपथ घेतली यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया, काँग्रेसचे दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now