Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवासात मिळणार ब्लँकेट आणि चादर; कोरोनामुळे थांबवण्यात आली होती सुविधा
सर्व रेल्वे झोनच्या महाव्यवस्थापकांना जारी केलेल्या आदेशात रेल्वे बोर्डाने म्हटले आहे की, या वस्तूंचा पुरवठा त्वरित प्रभावाने पुन्हा सुरू होईल.
Indian Railways: कोरोना महामारीमुळे सरकारने गेल्या दोन वर्षांपासून घातलेले निर्बंध हळूहळू मागे घेतले जात आहेत. अलीकडेच, आंतरराष्ट्रीय उड्डाणांना मंजुरी दिल्यानंतर सरकारने रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. गुरुवारी, रेल्वेने गाड्यांमध्ये ब्लँकेट आणि पडदे देण्याचे आदेश जारी केले आहेत.
कोरोना महामारीमुळे रेल्वेने दोन वर्षांपूर्वी सर्व निर्बंध लागू केले होते. याअंतर्गत रेल्वेतील प्रवाशांना मिळालेल्या ब्लँकेटचाही समावेश करण्यात आला आहे. आता हे निर्बंध हटवण्याचे आदेश रेल्वेने दिले आहेत. सर्व रेल्वे झोनच्या महाव्यवस्थापकांना जारी केलेल्या आदेशात रेल्वे बोर्डाने म्हटले आहे की, या वस्तूंचा पुरवठा त्वरित प्रभावाने पुन्हा सुरू होईल. (वाचा - 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना 16 मार्चला मिळणार मोठी भेट! खात्यात जमा होणार 38,692 रुपये)
रेल्वेने अन्न आणि ब्लँकेट सेवा पुनर्संचयित केली असली तरी, प्रवाशांसाठीच्या उर्वरित सवलती अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. रेल्वेने दिलेली ही सुविधा कोविडमुळे 2020 मध्ये बंद करण्यात आली होती. ब्लँकेट आणि चादरी मिळण्याची सुविधा कोणत्या तारखेपासून सुरू होईल, हे अद्याप रेल्वेने स्पष्ट केलेले नाही.