Rafale Deal: राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी, भारतीय राजकारणात खळबळ

भारतासोबत झालेल्या 59,000 कोटी रुपयांच्या राफेल विमान व्यवहारात कथीत भ्रष्टाचार आणि लाभ पोहोचविल्या प्रकरणी फ्रान्स (France) सरकारने चौकशी सुरु केली आहे

Rafale fighter jet | (Photo Credits: Dassault Website)

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Election 2019) मध्ये प्रचंड गाजलेला राफेल विमान व्यवहार (Rafale Aircraft) आणि कथीथ गैरव्यवहाराचा (Rafale Deal Controversy) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतासोबत झालेल्या 59,000 कोटी रुपयांच्या राफेल विमान व्यवहारात कथीत भ्रष्टाचार आणि लाभ पोहोचविल्या प्रकरणी फ्रान्स (France) सरकारने चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणाची चौकशी फ्रान्समधील एका न्यायाधीशांकडे सोपवली आहे. फ्रान्सच्या एका वृत्त संकेतस्थळ 'मीडिया पार्ट'ने आपल्या वृत्तात याबाबत दावा केला आहे. या वृत्ताचा हवाला देत काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अवाहन करत म्हटले आहे की, त्यांनी पुढे येऊन राफेल घाटाळा प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (JPC) द्वारे चौकशी करण्याचे आदेश द्यावे.

सुरजेवाला यांनी प्रसारमाध्यमांशी प्रतिनिधीशी बोलताना म्हटले की, फ्रान्समध्ये नवे खुलासे झाले आहेत. त्यामध्ये स्पष्ट होते की, राफेल खरेदी व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे म्हणने खरे ठरले आहे. आता हा घोटाळा सर्वांच्या समोर आला आहे. दरम्यान, राफेलबाबत आलेल्या नव्या वृत्ताबाबत भाजपच्या गोटातून मात्र कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

'मीडिया पार्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, दोन सरकारांमध्ये झालेल्या या व्यवहारांची चौकशी 14 जून पासून औपचारीकपणे सुरु झाली. या व्यवहारात फ्रान्स आणि भारत यांच्यात 2016 मध्ये खरेदी करारात स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. या संकेतस्थळाच्या वृत्तात म्हटले आहे की, 'भारताला 36 राफेल विमाने विकण्यासाठी 2016 मध्ये झालेल्या 7.8 अब्ज यूरो च्या व्यवहारावरुन फ्रान्समध्ये झालेल्या संशयास्पद व्यवहार अथवा भ्रष्टाचाराची चौकशी सुरु झाली आहे.' त्यांनी पुढे म्हटले आहे की, फ्रान्सच्या राष्ट्रीय वित्तीय अभियोक्ता कार्यालय (पीएनएफ) द्वारे ही चौकशी सुरु झाली आहे.

राफेल व्यवहारात झालेल्या कधीत अनियमिततेच्या मुद्द्यावरुन एप्रिलमध्ये 'मीडिया पार्ट'चा एक अहवाल पुढे आल्यानंतर आणि फ्रान्सच्या एनजीओ 'शेरपा'कडून तक्रार दाखल झाल्यानंतर पीएनएफद्वारे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. फ्रान्सीसी संकेतस्थळाने म्हटले आहे की, दोन सरकारांमध्ये झालेल्या या व्यवहारावरुन 14 जूनला अत्यंत संवेदनशिल मुद्द्यावर न्यायिक चौकशी औपचारीक स्वरुपात सुरु आहे. मीडिया पार्टशी संबंधित पत्रकार यान फिलिपीन यांनी म्हटले आहे की, 2019 मध्ये दाखल करण्यात आलेली पहिली तक्रार माजी पीएनएफ प्रमुखांकडून दाबण्यात आली होती. (हेही वाचा, Rafale लढाऊ विमान बनवणारी कंपनी दसॉ चे मालक आणि फ्रान्सचे उद्योगपती Olivier Dassault यांचा हेलिकॉप्टरच्या अपघतात मृत्यू)

दरम्यान, राहुल गांधी यांनी 'चोर की दाढी' असे म्हणत राफेल व्यवहारांवरुन खोचक ट्विट केले आहे. त्यावरुनही जोरदार चर्चा सुरु आहे.

राहुल गांधी ट्विट

एप्रिल महिन्यात या संकेतस्थळाने फ्रान्सच्या भ्रष्टाचार निर्मूलन संस्थेच्या चौकशीचा हवाला देत म्हटले होते की, राफेल विमान बनवणारी कंपनी दसॉल्ट एविशन ने एका भारतीय मध्यस्तास 10 लाख यूरो दिले होते. दसॉं एविएनशने या आरोपाचे खंडण केले होते. तसेच, म्हटले होते की,परस्परसंबंध बनविताना कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झाले नव्हते. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने या विमानांच्या व्यवाहार करारावर 23 डिसेंबर 2016 मध्ये स्वाक्षरी केली होती.

काँग्रेसचा आरोप आहे की, या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली आहे. तसेच, 256 कोटी रुपयांचे एक विमान 1970 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काँग्रेसतर्फे राफेल हा एक मोठा मुद्दा बनविण्यात आला होता. न्यायालयानेही क्लिन चिट दिल्याचे सांगत भाजपकडून काँग्रेसच्या आरोपांचे खंडण करण्यात आले होते.