Happy New Year 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना नववर्षाच्या दिल्या खास शुभेच्छा, येथे पाहा पोस्ट
पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एक संदेश शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी सर्वांना चांगले आरोग्य, समृद्धी आणि शाश्वत आनंदाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात लिहिले की, “हे वर्ष प्रत्येकासाठी नवीन संधी, यश आणि अनंत आनंद घेऊन येवो. सर्वांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो.”
Happy New Year 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वर्ष 2025 निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर एक संदेश शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी सर्वांना चांगले आरोग्य, समृद्धी आणि शाश्वत आनंदाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात लिहिले की, “हे वर्ष प्रत्येकासाठी नवीन संधी, यश आणि अनंत आनंद घेऊन येवो. सर्वांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो.” या संदेशात पंतप्रधानांनी देशवासियांच्या सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आणि नवीन वर्षाचा प्रत्येक दिवस नव्या आशेचा आणि नव्या संघर्षाचा प्रतीक ठरावा, असेही म्हटले आहे. जेणेकरून आपण सर्व आपले ध्येय साध्य करू शकू. हे देखील वाचा: India New Year 2025 Celebration: भारतामध्ये नवीन वर्ष 2025 ला सुरुवात; देशभरात मोठ्या उत्साहात झाले स्वागत
पंतप्रधान मोदींनी नवीन वर्षाच्या दिल्या खास शुभेच्छा
राष्ट्रपती मुर्मू यांनीही देशवासियांना नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात म्हणाल्या, “नवीन वर्ष २०२५ सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि सौहार्द घेऊन येवो. या निमित्ताने, आपण सर्वांनी मिळून उज्ज्वल आणि सर्वसमावेशक भविष्यासाठी आपल्या वचनबद्धतेचे नूतनीकरण करूया." या नवीन वर्षाच्या निमित्ताने राष्ट्रपती मुर्मू यांनी देशवासियांना एकत्र काम करण्याची आणि समाजात एकता आणि समृद्धी वाढवण्याची प्रेरणा दिली.