Worlds Most Admired Men 2021: जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या यादीत पंतप्रधान मोदी 8व्या स्थानी, तर बराक ओबामांची पहिल्या क्रमांकावर वर्णी
या यादीतील टॉप 20 मध्ये बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्याशिवाय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचाही समावेश आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जागतिक पातळीवर आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे. 2021 च्या जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या (Most Admired Men 2021) यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवून पंतप्रधानांनी पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. डेटा अॅनालिटिक्स कंपनी YouGov ने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे ही यादी जाहीर करण्यात आली आहे. ब्रिटीश मार्केट रिसर्च कंपनी YouGov ने जारी केलेल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रभावशाली व्यक्ती आणि राजकीय व्यक्तींना मागे टाकून 8 व्या स्थानावर विराजमान केले आहे. जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या 2021 च्या यादीमध्ये, PM मोदी हे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांसारख्या इतर राष्ट्रप्रमुखांच्या वर आहेत.
इम्रान खान प्रथमच या यादीत सामील झाले आहे. या यादीतील टॉप 20 मध्ये बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्याशिवाय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचाही समावेश आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तर अमेरिकन उद्योगपती बिल गेट्स दुसऱ्या स्थानावर आहेत. या सर्वेक्षणासाठी 38 देशांतील सुमारे 42,000 लोकांचा समावेश करण्यात आला होता.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि जगप्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅन यांनी या यादीत अनुक्रमे तिसरे, चौथे आणि पाचवे स्थान पटकावले आहे. या यादीतील इतर सेलिब्रिटींमध्ये टेस्लाचे सीईओ एलोन मस्क, चिनी उद्योगपती जॅक मा आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे. हेही वाचा Omicron Variant: ओमिक्रोनमुळे विमान कंपन्यांना फटका, तब्बल 'एवढ्या' कोटींंचे नुकसान
जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या 2021 च्या यादी व्यतिरिक्त, YouGov ने या वर्षी जगातील सर्वाधिक प्रशंसनीय महिलांची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे, तर अभिनेत्री अँजेलिना जोली आणि राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे. 2021 च्या सर्वाधिक प्रशंसनीय महिलांच्या यादीत, अभिनेत्री प्रियांका चोप्रा पहिल्या 10 मध्ये 10 व्या स्थानावर आहे. प्रियांका चोप्रा व्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चन 13 व्या आणि सुधा मूर्ती 14व्या स्ठानावर आहेत.