Prime Minister's National Child Award: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्यां हस्ते देशातील 11 मुलांना मिळणार प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

प्रत्येक विजेत्याला पदक, एक लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाईल.

President Draupadi Murmu (PC - ANI)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) सोमवारी देशातील 11 मुलांना त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) 2023 प्रदान करणार आहेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी पीएमआरबीपी विजेत्यांशी संवाद साधतील. एका अधिकृत निवेदनानुसार, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) देखील महिला आणि बाल विकास राज्यमंत्री मुंजपारा महेंद्रभाई (Munjpara Mahendrabhai) यांच्या उपस्थितीत विजेत्या मुलांशी संवाद साधतील आणि त्यांचे अभिनंदन करतील.

राष्ट्रपती बाल पुरस्कार मिळालेल्या मुलांमध्ये 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सहा मुले आणि पाच मुलींचा समावेश आहे. प्रत्येक विजेत्याला पदक, एक लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाईल. निवेदनानुसार, यावर्षी कला आणि संस्कृती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी चार प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, एक शौर्य, दोन नवनिर्मितीसाठी, एक समाजसेवेसाठी आणि तीन क्रीडा क्षेत्रात देण्यात येणार आहेत.

केंद्र सरकार मुलांना त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी PMRBP पुरस्कार देते. 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, शिक्षण, समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या अपवादात्मक कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो, जे राष्ट्रीय स्तरावर मान्यतेस पात्र आहेत. हेही वाचा 7th Pay Commission: खुशखबर! एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना यावर्षी मिळू शकतात 3 भेटवस्तू

विशेष म्हणजे, प्रत्येक पुरस्कार विजेत्याला एक पदक, रोख एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाईल. 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, शिक्षण, समाजसेवा आणि क्रीडा यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो, जे राष्ट्रीय स्तरावर सन्मानास पात्र आहेत. गतवर्षी 29 बालकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.