Polluted City in India : पटना हे देशातील दुसरे सर्वात प्रदूषित शहर, संपूर्ण शहरात अतिशय वाईट हवेची नोंद; तर पहिल्या क्रमांकावर...

या यादीत ग्रेटर नोएडा अव्वल साथानावर आहे. 346 च्या AQI सह ग्रेटर नोएडा पहिल्या स्थानावर आहे. तर गाझियाबाद (309) तिसऱ्या क्रमांकावर होते.

Air Pollution (PC - ANI)

Polluted City in India: बिहारची राजधानी म्हणजेच पाटणा शहरात हवेची गुणवत्ता खालावली आहे. रविवारी हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) 316 होता. जो 'अत्यंत खराब' श्रेणीत मोडतो. त्याशिवाय हवेची गुणवत्ता असलेल्या देशातील तीन शहरांची नावेही समोर आली आहेत. पटनामधील हवेची पातळी निर्धारित सुरक्षित मर्यादेपेक्षा जवळपास सात पट खालावल्याचे नोंदवले गेले आहे. हवेची पातळी खालवण्याचे कारण म्हणजे हवेत विषारी धुलीकणांचा समावेश आहे. परिस्थीती अशीच राहिल्यास त्यामुळे तिथल्या नागरिकांना श्वसनाचे आजार होऊ शकतात असे सांगण्यात येत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) 247 शहरांतील हवेची गुणवत्ता दाखवणारी यादी जारी केली आहे. जारी केलेल्या AQI डेटानुसार, तीन शहरांत 'अत्यंत खराब' AQI दाखवला गेला.

या यादीत ग्रेटर नोएडा अव्वल साथानावर आहे. 346 च्या AQI सह ग्रेटर नोएडा पहिल्या स्थानावर आहे. तर गाझियाबाद (309) तिसऱ्या क्रमांकावर होते. पटनामध्ये शनिवारीही 307 चा 'अत्यंत खराब' AQI होता, त्याआधी शुक्रवारी 'खराब' 257 होता. दरम्यान, पाटणा हवामान केंद्राने, यानंतर सकारात्मकबाब सांगितली आहे. येत्या आठवड्यापासून पाटणा आणि त्याच्या शेजारच्या भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले आहे.

पाटणा शहरातील, समनपुरा हे 371 च्या AQI सह सर्वाधिक प्रदूषित क्षेत्र होते. त्यानंतर मुरादपूर (362), खगौल (305), तारांगण (295) आणि राजबंशी नगर (261) या शहरात हवेची गुणवत्ता अत्यंत खराब होती. पटनामध्ये PM 2.5 पातळी 104 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवली गेली. WHO च्या 24 तासांच्या हवा गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वांच्या शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा सुमारे 6.9 पट जास्त.

बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (BSPCB) कडून खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेवर प्रतिक्रीया देताना सांगण्यात आले की, गांधी मैदानाजवळील बांधकामांमुळे अनुक्रमे समनपुरा आणि मुरादपूर भागातील हवेती गुणवत्ता खालावली आहे. “गंगा नदीच्या काठावरुन वाऱ्यासह येणाऱ्या चिकणमाती गाळामुळे मुरादपूर येथील प्रदूषण वाढले आहे. दरम्यान, बांधकाम स्थळांजवळ पाणी शिंपडणे आणि फॉगिंगसह संबंधित विभागांकडून खबरदारी घेतली जात आहे. याची खात्री करण्यासाठी बीएसपीसीबीने सर्वेक्षकांना निर्देश दिले आहेत.

त्याशिवाय, उच्च तापमान असलेल्या हैदराबादमध्येही प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. एनआयटी त्रिचीच्या अभ्यासाने आसिफ नगर, चारमिनार, गोलकोंडा भागात इतर ठिकाणांपेक्षा 2.6C पेक्षा जास्त प्रदूषक नोंदवले गेले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now