CPI(M) Leader Sitaram Yechury Passes Away: माकपचे नेते सीताराम येचुरी यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन

ते 72 वर्षांचे होते. येचुरी यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये (AIIMS Delhi) उपचार सुरू होते. श्वसनमार्गाच्या तीव्र संसर्गामुळे त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले होते.

Sitaram Yechury | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सीपीआय(एम) (CPI(M)) चे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार सीताराम येचुरी (Sitaram Yechury Passes Away) यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी (12 सप्टेंबर) निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. येचुरी यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये (AIIMS Delhi) उपचार सुरू होते. श्वसनमार्गाच्या तीव्र संसर्गामुळे त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे डॉक्टरांच्या एका पथकाच्या देखरेखीखाली श्वसन सहाय्य होते. भारतीय राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व असलेले येचुरी, 2015 पासून प्रकाश करात यांच्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस होते. पक्षातील योगदान आणि राष्ट्रीय राजकारणातील भूमिकेसाठी ते देशभरात ओळखले जात.

सीताराम यचुरी यांचा राजकीय वारसा

सन 1974 मध्ये भारतीय विद्यार्थी महासंघात (एसएफआय) मध्ये सहभागी झाल्यापासून सीताराम येचुरी यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. 1975 मध्ये ते सीपीआय(एम) चे सदस्य बनले आणि आणीबाणीच्या काळात लवकरच त्यांना अटक करण्यात आली, ज्यामुळे राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग सुरू झाला. राष्ट्रीय मोर्चा आणि संयुक्त मोर्चाच्या काळात आघाडी सरकारांना पाठिंबा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हरकिशन सिंह सुरजीत सारख्या वरिष्ठ नेत्यांकडून अनेक गोष्टी शिकत त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरु ठेवला. जो त्यांना पक्षाच्या सरचीटणीस पदापर्यंत घेऊन गेला. (हेही वाचा, Sitaram Yechury Health Update: सीताराम येचूरी यांना फुफ्फुसांच्या संसर्गाचा त्रास होत असल्याने Delhi AIIMS मध्ये केले दाखल; प्रकृती चिंताजनक)

पहिल्या युपीए सरकार (2004-2009) दरम्यान पक्षाच्या भूमिकेला आकार देण्यात येचुरी यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण होते. भारत-अमेरिका अणु कराराबाबत सरकारशी झालेल्या वाटाघाटींमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.या मतभेदामुळे डाव्या पक्षांनी युपीए-आय सरकारचा पाठिंबा मागे घेतला. (हेही वाचा, Ashish Yechury Passes Away: CPI(M) चे नेते Sitaram Yechury यांच्या मुलाचे कोविड 19 मुळे निधन)

येचुरी यांचे काही शेवटचे दिवस

सीताराम येचुरी यांच्या आयुष्यातील शेवटचे काही दिवस रुग्णालयात गेले. रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येचुरी ऑक्सिजन सपोर्टवर होते आणि तज्ञांच्या निगराणीखाली होते. बुधवारी त्याची प्रकृती "गंभीर पण स्थिर" असे म्हटले गेले, मात्र गुरुवारी त्यांचे निधन झाले. पक्ष आणि रुग्णालयाच्या सूत्रांनी गुरुवारी त्यांच्या निधनाच्या बातमीची पुष्टी केली. ज्यामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली. (हेही वाचा, Coronavirus: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पहिल्यांदाच सहभाग, शरद पवार, सीताराम येच्युरी, एम के स्टॅलिन यांचीही उपस्थिती)

सीपीआय (एम) ने एका निवेदनात स्पष्ट केले की, येचुरी यांना न्युमोनियाची लागन झाली होती. ऑगस्टच्या मध्यापासून ते या गंभीर आजाराशी झुंजत होते. दरम्यान, येचुरी यांच्या निधनाच्या बातमीनंतर अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट केले, " काही वर्षांपूर्वी माझ्याबरोबर संसदेत सहकारी असलेले सीताराम येचुरी यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो."

येचुरी यांनी भारतीय राजकारणात एक भक्कम वारसा सोडला आहे. सीपीआय(एम) मध्ये त्यांचे योगदान आणि राष्ट्रीय निर्णय घेण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. महत्त्वाचे म्हणजे त्यांचा प्रभाव डाव्या आघाडीच्या पलीकडेही होता आणि सर्वपक्षीय मित्रांमध्ये त्यांचा समावेश होतो.