समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कोविड वॉरिअर्सवर पुष्पवृष्टी केल्याने उपस्थितीत केले प्रश्नचिन्ह
त्यामुळे दिवसरात्र कोरोनाबाधितांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स उपचार करत आहेत.
देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे दिवसरात्र कोरोनाबाधितांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स उपचार करत आहेत. तसेच पोलीस दलातील कर्मचारी ही अहोरात्र आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहे. याच दरम्यान, आज कोरोना वॉरियर्सच्या प्रती सम्मान करण्यासाठी भारतीय वायुसेनेकडून मानवंदना देण्यात आली. त्यावेळी देशातील रुग्णालय आणि महत्वाच्या ठिकाणी कोविड वॉरियर्सवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. परंतु आता समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी कोरोना वॉरियर्सवर पुष्पवृष्टी केल्यावर प्रश्न उपस्थितीत केले आहेत.
रविवारी अखिलेश यादव यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, यूपीत विविध ठिकाणी क्वारंटाइन सेंटरची अवस्था भयंकर असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे याच्या विरोधात आंदोलनासाठी बसलेल्या महिलांना शासन-प्रशासनाकडून धमकी दिली जात आहे. जर खाण्यापिण्याच्या समान व्यवस्थेबाबत सुधारण्याचे आश्वासन दिले गेले तर विमातून पुष्पवृष्टी करण्यात काय तर्क आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.(Coronavirus in India: भारतातील मृत्यूदर सर्वात कमी असून आज देशात तब्बल 10,000 रुग्ण कोरोना मुक्त- आरोग्य मंत्रालयाची माहिती)
याआधी अखिलेश यादव यांनी स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून घरी जाणाऱ्या कामगारांकडून भाजप सरकार पैसे घेत असल्याची बाब खरच वाईट आहे. कोट्यावधी भांडवलदारांना क्षमा करणारा भाजपा श्रीमंतांच्या आणि गरीबांच्या विरोधात असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. तसेच आपत्तीच्या वेळी शोषण करणे हे सरकारचे नव्हे, तर व्यापापाऱ्यांचे काम आहे असे ही अखिलेश यादव यांनी म्हणत टीका केली आहे.