राजस्थान विधानसभा निवडणूक: राहुल गांधींनी सांगितले गोत्र; नरेंद्र मोदींकडून जातीचा खुलासा; प्रचारातून विकासाचा मुद्दा गायब

जात, गोत्र, धर्म आदी मुद्द्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकीय पक्षांकडून अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या मुद्द्याचा थेट जनतेच्या प्रश्नाशी काय संबंध? असा प्रश्न मदतार विचारु लागले आहेत.

राहुल गांधी, कांग्रेस अध्यक्ष आणि नरेंद्र मोदी, पंतप्रधान(Archived, edited, images)

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ ,तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला आहे. या धुरळ्यात सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारपातळीला वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. निवडणूक प्रचारातून शिक्षण, आरोग्य, महिला, नोकऱ्या, पर्यावरण आदी मुद्दे बाजूला पडले आहेत. जात, गोत्र, धर्म आदी मुद्द्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. राजस्थान येथील निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदींनी आपली जात सांगितली तर, राहुल गांधीनी आपले गोत्र. राजकीय पक्षांकडून अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या मुद्द्याचा थेट जनतेच्या प्रश्नाशी काय संबंध? असा प्रश्न मदतार विचारु लागले आहेत.

एका कांग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींच्या जातीवर आधारीत वक्तव्य केले. त्यावर भाजप नेत्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टिप्पणी करत त्यांचे गोत्र विचारले. अखेर राहुल गांधी यांनी राजस्थान दौऱ्यात सोमवारी आपले गोत्र सांगितले. राहुल गांधी यांनी अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गाह येथे चादर चढवली. त्यानंतर ते पुष्कर येथील जगतपिता ब्रह्मा जी मंदिरात गेले. येथेच त्यांनी आपल्या गोत्र बाबत खुलासा केला.

कौल दत्तात्रेय ब्राह्मण आहेत राहुल गांधी

पुष्कर येथील मंदिरात दर्शन घेताना राहुल गांधी यांना पूजा तेथील पुजाऱ्याने गोत्र विचारले. पुजाऱ्याच्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी तत्काळ उत्तर दिले. ते कौल ब्रह्मण आहेत आणि त्यांचे गोत्र दत्तात्रेय आहे. त्यानंतर राहुल यांनी मंदिरात पूजा केली. राहुल गांधी जेव्हा जेव्हा मंदिरात जातात तेव्हा भाजपकडून नेहमीच त्यांच्यावर टीका केली जाते. मध्य प्रदेश निवडणूक प्रचारादरम्यनही भाजप प्रवक्त संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्यावर टीका करत, आपण खरोखरच जनेऊधारी आहात काय? असाल तर आपले गोत्र कुठले असा सवाल विचारला होता. ज्याला राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये उत्तर दिले. (हेही वाचा, अखेर राम मंदिर प्रश्नावर नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले; अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी काँग्रेसची इच्छा नाही)

नरेंद्र मोदींनी सांगितली जात

दरम्यान, नरेंद्र मोदी यांची जात कोणती असा प्रश्न काँग्रेस नेते सी पी जोशी यांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ' देशातील पंतप्रधान विदेशात जातो, त्यावेळी त्याची जात एकच असते आणि ती म्हणजे ‘सव्वाशे कोटी भारतीय’, आणि तिच माझी जात आहे', असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते राजस्थान येथील भिलवाडा येथे बोलत होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif