IPL Auction 2025 Live

Raj Thackeray on Marathwada Visits: राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाठीभेटीवर भर

14 डिसेंबरपासून राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर (Maharashtra Visit) जाणार असून राज्याच्या 6 विभागांमध्ये 6 बैठका घेणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) प्रसारमांध्यमांना दिली आहे.

MNS President Raj Thackeray | (File Image)

मुंबई: पुढील वर्षी राज्यात महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) देखील कंबर कसल्याचं दिसून येत आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरें (Raj Thackeray) सोबत आज मुंबईत (Mumbai) बैठक झाली. त्यानुसार येत्या 14 डिसेंबरपासून राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर (Maharashtra Visit) जाणार असून राज्याच्या 6 विभागांमध्ये 6 बैठका घेणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) प्रसारमांध्यमांना दिली आहे. त्यासोबतच, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन पूर्ण झाल्याचं देखील ते यावेळी म्हणाले आहे. राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पक्षांतर्गत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

राज ठाकरें येत्या 6 तारखेला पुण्याला जाणार आहे. तेथील कार्यकर्ते आणि पदधिकाऱ्यांसोबत बैठक घेवुन मग 14 तारखेपासुन त्यांचा मराठवाडा दौरा सुरु होणार आहे. 14 तारेखेला राज ठाकरें औरंगाबादला पोहचतील आणि कार्यकर्ते आणि पदधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील व त्यांनतर ते पत्रकारांशी संवाद साधतील असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे. ( हे ही वाचा Maharashtra Government Holidays 2022: महाराष्ट्रातील शासकीय सार्वजनिक सुट्ट्यांची पुढील वर्षासाठी लिस्ट जाहीर, येथे पहा.)

मराठवाड्यातील पदधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर राज ठाकरें 16 डिसेंबरला पुण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पक्षांतर्गत विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येणार असून राज्याच्या 6 विभागांमध्ये 6 बैठका घेणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. वेळापत्रकानुसार त्यांचा अयोध्येला जाण्याचाही निर्णय झाला आहे. ती तारीख अद्याप ठरलेली नाही. पण आमची अयोध्या दौऱ्याची तयारी झाली आहे”, असेही ते म्हणाले आहे.