Congress Protest On PM Narendra Modi: महाराष्ट्राचा अवमान करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसकडून राज्यात निषेध आंदोलन
त्यामुळे मोदींनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पंतप्रधान मोदी माफी मागा, हुकूमशाही चालणार नाही, अशा घोषणा दिल्या जात आहेत.
कोरोनाच्या प्रसाराला महाराष्ट्र काँग्रेस (Congress) जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केला. त्यामुळे काँग्रेसने आता संपूर्ण राज्यात पंतप्रधान मोदींविरोधात (Congress Protest On PM Narendra Modi) आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजपच्या (BJP Office) कार्यालयांसमोर काँग्रेसचे आंदोलन करण्यात येत आहे. नरेंद्र मोदींनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी या आंदोलनातून होत आहे. मुंबईमध्ये मंत्रालयासमोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नसल्याचंही पटोले यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे मोदींनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पंतप्रधान मोदी माफी मागा, हुकूमशाही चालणार नाही, अशा घोषणा दिल्या जात आहेत.
Tweet
देशाचे विभाजन करण्याच्या विचाराने हे सरकार बसले - नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशाचे विभाजन करण्याच्या विचाराने हे सरकार बसले आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी देश मजबूत करण्याबाबत बोलत असतानाच, महाराष्ट्राचे वर्णन देशात कोरोनाचे वाढते राज्य म्हणून केले जात आहे. ज्या राज्याने इथल्या लोकांना मदत करण्याचे काम केले, त्या जनतेचा अपमान करण्याचा अधिकार पंतप्रधानांना दिलेला नाही असेही नाना पटोले म्हणाले आहे.
औरंगाबाद-जालना रस्त्यावरील मुकंदवाडी बसस्थानकावर दुपारी 12 च्या दरम्यान धरणे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार हाय-हाय, मोदी सरकार माफी मागा, मोदी सरकार हाय अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या, तसेच मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. (हे ही वाचा Nawab Malik On Devendra Fadnavis: हा सगळा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू, नवाब मलिक यांची फडणवीस यांच्यावर टीका)
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
भारताने कोरोनाच्या संकटावर मात केली आहे. मात्र कोरोनाच्या महामारीतही विरोधकांनी राजकारण केले आहे. देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे. कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यास भाग पाडले. “कोरोनाच्या काळात, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्वांना ते जिथे आहेत तिथेच राहण्यास सांगितले. मात्र काँग्रेसने यूपी-बिहारमधील कार्यकर्त्यांना मुंबई सोडण्याचे आवाहन केले. नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप केला आणि कामगार स्टेशनबाहेर उभे राहून परप्रांतीय कामगारांना राज्याबाहेर पाठवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.