Political Status and Marathi Taunt: राजकीय स्टेटस आणि मराठी टोमणे, कार्यकर्त्यांच्या Whatsapp आणि सोशल मीडियासाठी

जो कार्यकर्त्यांकडून अनेकदा डोकं बाजूला ठेऊन खाल्ला जातो. अशा कार्यकर्त्यांसाठी इथे खास पोलिटीकल स्टेटस आण खास मराठी टोमणे देत आहोत. जे कार्यकर्ते आपल्या सोयीने वापरु शकतात.

Political Leaders | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Political of Maharashtra: राजकारण म्हटलं की राजकीय नेता आला आणि राजकीय नेता म्हटलं की कार्यकर्ता आला. आता हा कार्यकर्ता म्हणजे नेत्याचा डावा किंवा उजवा हात. जो नेत्याच्या गरजेनुरुप पहिजे तेव्हा, पाहिजे तेवढा आणि पाहिजे तसा वापरला जातो. डोकं बाजूला ठेवणं आणि केवळ अनुयायी म्हणून दिलेले आदेश पाळणं ही कट्टर आणि एकनिष्ठ कार्यरर्ता होण्याची पहिली पात्रता असते. जे कार्यकर्ते अपवाद वगळता चोख पूर्ण करतात. त्यामुळे आपल्या नेत्याची बाजू उचलून धरणं. त्यासाठी स्थानिक किंवा संमांतर पातळीवर टीका, टिप्पणी करणे. विरोधकाला हिनवणं, डिवचणं ओघानंच आलं. अशा वेळी आजकाल मदतीस येतात तो डीजिटल मीडिया. होय, व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबूक, इन्स्टाग्राम यांवर ठेवले जाणारे राजकीय स्टेटस (Political Status), छोट्या मोठ्या भाषणांवेळी मारले जाणारे टोमणे (Political Taunt In Marathi ) म्हणजे कार्यकर्त्यांसाठी बैद्धीक खाऊच जणू. जो कार्यकर्त्यांकडून अनेकदा डोकं बाजूला ठेऊन खाल्ला जातो. अशा कार्यकर्त्यांसाठी इथे खास पोलिटीकल स्टेटस आण खास मराठी टोमणे देत आहोत. जे कार्यकर्ते आपल्या सोयीने वापरु शकतात.

महाराष्ट्राचे राजकारण समजून घेताना राजकी संस्कृतीही समजून घ्यावी लागते. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष तसे एकमेकांशी खेळीमेळीने राहतात. त्यांच्यात टोकाचे वितूष्ठ पाहायला मिळाले नाही. पण, ते जेव्हा राजकीय व्यासपीठावर येता तेव्हा तेच राजकीय नेते राजकीय टोमणे मारुण एकमेकांना बेजारही करतात. (हेही वाचा, Wife Birthday Wishes In Marathi: बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा! अर्धांगिनीसाठी बॅनर, स्टेटस अन हटके मेसेज; एका क्लिकवर)

सोशल मीडियासाठी राजकीय स्टेटस

मराठी टोमणे

सार्वजनिक जीवनात वावरताना मतभेद होणे स्वाभाविक आहे. त्यातही राजकारणासारख्या 24 तास लोकांमध्ये असणाऱ्या क्षेत्रात तर अधिकच. अशा वेळी आपण जर शब्दांचा तोल सांभाळला तर भविष्यात येणाऱ्या अडचणी मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात. आज आपण वापरलेला शब्द भविष्यात आपल्यासाठी एक इतिहास ठरतो. त्यामुळे लोकांशी वर्तन आणि संवाद साधताना अत्यंत जपूनच राहिलेले बरे.