IPL Auction 2025 Live

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा होणार लिलाव, नवीन वेबसाईट सुरु

तसेच हा लिलाव रविवार (27 जानेवारी) पासून सुरु झाला असून त्यासाठी खासकरुन एक नवी वेबसाईट बनविण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होणार आहे. तसेच हा लिलाव रविवार (27 जानेवारी) पासून सुरु झाला असून त्यासाठी खासकरुन एक नवी वेबसाईट बनविण्यात आली आहे. त्यातील मुख्य भेटवस्तू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक अप्रतिम असा फोटो असून त्याची किंमत फक्त 1,000 रुपये आहे. परंतु लिलावामध्ये या फोटोची किंमत 22,000 रुपये एवढी लावण्यात आलेली आहे. याबाबात संस्कृति मंत्रालयाने अधिक माहिती दिली आहे.

दिल्ली (Delhi) येथील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय (NGMA) येथे लिलाव आयोजित करण्यात आला आहे. तर लिलावामध्ये जमा होणारा पैसा हा नमामि गंगे या योजनेसाठी उपयोगात आणला जाणार आहे.त्यासाठी संस्कति मंत्रालयाकडून https://pmmementos.gov.in/ ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. (हेही वाचा-पंतप्रधानांच्या तामिळनाडू दौऱ्याविरुद्ध सोशल मिडियावर आंदोलन; #GoBackModi हॅशटॅग ट्रेंडमध्ये)

या लिलावाची प्रक्रिया 28 जानेवारीला पूर्ण होणार आहे. मात्र राहिलेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव 29 ते 31 जानेवारी रोजी होणार आहे. तर पितळ, चिनी माती, कपडे, काचेच्या वस्तू, सोने आदी विविध प्रकारच्या वस्तूंबाबत एक श्रेणी बनविण्यात आलेली आहे. त्यानुसार वेबसाईटवर वस्तूबद्दल माहिती देण्यात आली असून ती किती वजनाची आहे हेही सांगण्यात आलेले आहे.

काही भेटवस्तूंमधील एक अशी राधा-कृष्णाची मूर्ती असून त्यावर सोन्याचे आवरण देण्यात आलेले आहे. तर या मूर्तिची किंमत जवळजवळ 20,000 रुपये एवढी ठरविली आहे. ही मूर्ती मोदी यांना सूरत येथील मांडवी नगर पालिकेकडून भेट देण्यात आली होती. तसेच भेटवस्तूंधील सर्वात महागडे असे एक चांदीचे स्मृतिचिन्ह 2.22 किलोग्रॅमचे असून त्याची किंमत 30,000 रुपये एवढी आहे.