महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणाऱ्याला मंत्रिपद याहून दुर्दैव काय! निलेश राणे यांनी 'या' नवनिर्वाचीत मंत्र्यावर साधला निशाणा (Watch Video)
महाराष्ट्राला भिकारी बनवू इच्छिणाऱ्या व्यक्तीला मंत्रीपद देणे हे दुर्दैव आहे असे म्हणत त्यांनी या मंत्र्यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी आज महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार कार्यक्रम पार पडला. यामध्ये भाजपा (BJP) पक्षाला दहा, शिवसेनेला (Shivsena) दोन तर रिपाइं (RPI) ला एक मंत्री पद देण्यात आले. या कार्यक्रमानंतर लगेचच महाराष्ट्रातील इतर नेते मंडळींनी मंत्र्यांच्या निवडीवर प्रश्न उभारायला सुरवात केली. यामध्ये महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे निलेश राणे (Nilesh Rane) यांनी देखील एक ट्विट करून, "महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणाऱ्याला मंत्रिपद याहून दुर्दैव काय" असा सवाल केला. खरतर निलेश यांचा इशारा हा शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Savant) यांच्याकडे होता. विधान परिषदेतील शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या एका भाषणातील व्हिडीओ शेअर करून निलेश राणेंनी शिवसेनचा चांगलाच समाचार घेतला आहे.
निलेश राणे ट्विट
निलेश राणे यांनी २०१७ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील उमेदवार तानाजी सावंत यांच्या एका प्रचारसभेतील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तानाजी सावंत यांची जीभ काहीशी घसरताना दिसतेय. या व्हिडिओमध्ये तानाजी यांनी "सव्वाशे दीडशे कोटींचा कारखाना घ्यायला मला काही कठीण नाही, तानाजी सावंत हा भिकारी झालाय असा काही लोकांचा गैरसमज झालाय, मी अक्ख्या महाराष्ट्रालाच भिकारी बनवेन पण तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही" याप्रकारचे आक्षेपार्ह्य विधान करताना बघायला मिळत आहेत. अशा प्रकारचे विधान करणाऱ्या नेत्याला मंत्रीपद देणे हे दुर्दैवाचे आहे असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. डान्स बार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे छोटा पेग्विंन खुश असणार -निलेश राणे
तानाजी सावंत व्हिडीओ
दरम्यान, एका प्रतिक्रेयत त्यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली असली तरी हे दोन्ही नेते राष्ट्रवादीचे आहेत, असे म्हणत राणे यांनी उद्धव यांना खडेबोल सुनावले आहेत.